महाराष्ट्र रेल्वे लवकरच फाटक मुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ‘रेल्वे ब्रिज'चे काम ‘महारेल'ने हाती घेतले आहे. ‘महारेल'ने आतापर्यंत ३२ पूल पूर्ण केले आहेत. यावर्षी २५ पूल ‘महारेल'च्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचे आहे, त्या दृष्टीने ‘महारेल'कडे जबाबदारी दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र रेल इनफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रे-रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज आणि टिटवाळा रोड ओवर ब्रिजच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता-नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चित्रा वाघ, ‘महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग'च्या अध्यक्षा सुशीबेन शाह, आमदार मनोज जामसुतकर, आमदार प्रवीण दरेकर, ‘महारेल'चे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल, आदि उपस्थित आहेत. तर टिटवाळा येथे आमदार विश्वनाथ भोईर, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आदि दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

पूल देखील एक आकर्षणाचे केंद्र असते, ते आपल्या शहराचे एक प्रकारे मूल्य वाढवणारी अशा प्रकारची एक वास्तू असते. सदर विचार करून त्याच्यामध्ये विद्युत रोषणाईसह अन्य वेगवेगळ्या प्रकारे कामे करुन उत्कृष्ट वास्तू तयार केली आहे.  नागपूरमध्येही ‘महारेल'च्या माध्यमातून अशा प्रकारचे १० पूल तयार झालेले आहेत, त्याचेही लोकार्पण लवकरच करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

रे-रोड केबल स्टेड ब्रिज...

संत सावता माळी मार्गावरील रे-रोड आणि डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकांदरम्यान हार्बर लाईनवरील ‘मध्य रेल्वे' च्या मार्गावर रे-रोड स्थानकाजवळ ६ लेनचा केबल स्टेड रोड ओवर ब्रिज आहे. सदरचा ‘महारेल'द्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज आहे.

टिटवाळा रोड ओवर ब्रिज...

कल्याण-इगतपुरी विभागातील टिटवाळा आणि खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान कल्याण रिंग रोडवर टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ४ लेनचा रोड ओवर ब्रिज आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला लवकरच गती