कल्याण ग्रामीणमध्ये फिरते पोलीस स्टेशन
कल्याण : ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका पोलीस ठाणेच्या ग्रामीण भागासाठी फिरते पोलीस स्टेशन (डिजीटल व्हॅन) असा अभिनव आणि अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. टिटवाळा येथे देखील या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, आश्रम शाळा, कॉलेज, गुरवली (आदिवासी वाडी), मांडा टिटवाळा, वासुंद्री, गणपती मंदिर (टिटवाळा) आणि निमकर नाका अशा ठिकाणी भेट घेऊन त्यांना फिरते डिजीटल व्हॅन पोलीस स्टेशन तयार करण्यात आले आहे. तसेच डिजीटल व्हॅन बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर महत्वाकांक्षी उपक्रमाचा मुख्य उदेश म्हणजे पोलीस सेवा अधिक लोकाभिमुख करणे आणि नागरिकांमध्ये कायद्याची जागरुकता वाढविणे, थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे त्वरीत निराकरण करणे, असा आहे. तसेच या अभिनव कार्यक्रमांद्वावरे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे पथक गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
नवीन कायदयाची माहिती, सुरक्षाबाबत मार्गदर्शन तसेच जनजागृतीसाठी विविध माहितीपर चित्रफिथ दाखविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या कार्याक्रमांत नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या घरी जाऊन ऐकल्या जात आहेत. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या गेल्या जात आहेत. पोलिसांविषयी अधिक विश्वास वाढला असून कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
फिरते डिजीटल पोलिस स्टेशन गाडी मधून साखळी चोरी, बाल लेंगिक शोषण, सोशल मिडीयाचा वापर कसा करायचा, जर कोणी मुलीची छेड काढली तर तिला मदत कशी करायची, ट्रॅफिक नियमांचे पालन कसे करायचे, आदिवासी पाडे, विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची भेट घेऊन त्यांना काही त्रास आहे काय? आणि असेल तर डिजीटल व्हॅन अंतर्गत त्यांची तात्काळ तक्रार नोंदवून तिचे तात्काळ निरसन करणे, असा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर डिजीटल पोलीस स्टेशनचा उल्लेखनीय उपक्रम कल्याण ग्रामीण भागातील नागरिीकांमध्ये विश्वास निर्माण करणारा तसेच पोलीस आणि जनतेमधील संबंध अधिक बळकट करणारा ठरत आहे. कल्याण तालुक्यातील नागरिकांनीही या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले असून त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत सकारत्मक ऐकायला मिळत आहेत. पोलीस अधीक्षक (ठाणे ग्रामीण) डॉ. डी. स्वामी यांनी डिजीटल फिरते पोलीस ठाणेच्या गाडीतील सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.