सेंट मेरीजचा अर्श चौधरी आयसीएसई परीक्षेत देशात अव्वल  

नवी मुंबई : कोपरखैरणे मधील सेंट मेरीज आयसीएसई आयसीएसई स्कुलच्या अर्श चौधरी याने ‘आयसीएसई बोर्ड'च्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण प्राप्त करुन देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सेंट मेरीज शाळेचा निकाल १०० टक्के लागल्यामुळे शाळेत आनंदोत्सवाचे वातावरण आहे.  

मालंकारा ऑर्थोडॉक्स चर्च कौन्सिल ऑफ बॉम्बे (एमओसीसीबी) अंतर्गत संचालित सेंट मेरीज आसीएसई स्कुल, कोपरखैरणे या शाळेने आपली उज्वल शैक्षणिक परंपरा कायम राखली असून दहावी आणि बारावी परीक्षेचा १०० टक्के निकाल असे त्याचे द्योतक असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका ब्लेसी मॅथ्यूज आणि उपमुख्याध्यापक फादर जॉन मॅथ्यू यांनी सांगितले. यावर्षी अर्श चौधरी याने १०० टक्के गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. सदरची अपूर्व आणि दुर्मिळ कामगिरी त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, अभ्यासातील प्राविण्याचा आणि उत्कृष्टतेच्या ध्येयाचा साक्षात्कार असल्याचे त्या म्हणाल्या.  

सेंट मेरीज शाळेने मिळवलेल्या या गौरवपूर्ण यशाबद्दल, बॉम्बे धर्मप्रांताचे धर्माध्यक्ष तथा ‘एमओसीसीबी'चे अध्यक्ष आर्च बिशप हिस ग्रेस गीवरघीस मार कुरीलोस यांनी अर्श चौधरी याचे अभिनंदन करुन त्याने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगितले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

आयटीआय मध्ये नवीन ६ अभ्यासक्रम