महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या त्रिशाचा महापालिकातर्फे सन्मान
भाईंदर : नाळ-२ या मराठी चित्रपटात साकारलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी भारत सरकारचा प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पुरस्कार विजेती तथा मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत मीरा रोड येथे राहणाऱ्या त्रिशा ठोसर हिचा मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांकडून सन्मान करण्यात आला.
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात राहणारी हरहुन्नरी बालकलाकार त्रिशा ठोसर हिने नाळ-२ या मराठी चित्रपटात साकारलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी भारत सरकारचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार (राष्ट्रपती पुरस्कार) पटकावला आहे. या यशामुळे मिरा-भाईंदर शहराचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर झळकला. त्रिशा हिच्या या अद्वितीय यशाचा गौरव करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी महापालिकेच्या वतीने तिचा शाल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्रिशाच्या या यशामध्ये तिच्या कौटुंबिक पाठिंब्याबरोबरच गुरुजनांचे मार्गदर्शन आणि तिच्या आत्मविश्वासाचा मोठा सहभाग आहे. बालवयात मिळवलेला सदर सन्मान केवळ तिचाच नाही, तर मिरा-भाईंदर शहराचा आणि महाराष्ट्राचा देखील अभिमान वाढवणारा आहे. महापालिका त्रिशाच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन देत राहील आणि तिच्या उज्वल भविष्याच्या वाटचालीत सदैव सोबत राहिल, असे आयुवत राधाबिनोद शर्मा यांनी यावेळी सांगितले.