वाशीमध्ये शिवसेनेचे जनआक्रोश आंदोलन

नवी मुंबई : महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छेडण्यात आलेल्या आंदोलनात नवी मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख एम. के. मढवी, राज्य संघटक अवधेश शुक्ला, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, युवासेना सहसचिव करण मढवी, विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी,  उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सूर्यकांत मडवी, आत्माराम सणस,  सुमित्रा कडू, शत्रुघ्न पाटील,  संजय तुरे,  संजय गव्हाणे,  संदीप पाटील, मनोज इसवे, शहरप्रमुख महेश कोटीवाले, विशाल सणस, उपजिल्हा संघटक विनया मढवी, वैशाली घोरपडे, उषा रेणके, विधानसभा संघटक आशा शिंदे, भाग्यश्री पिसाळ, माजी परिवहन सदस्य समीर बागवान, राजू आव्हाड आदी सहभागी झाले होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सफाई कामगार ६ महिने पगारापासून वंचित