भाजपा तर्फे पनवेल मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

पनवेल : मराठी राजभाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड सांस्कृतिक सेल तर्फे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘संदीप वैभव... आणि कविता' या वैभव जोशी आणि संदीप खरे यांच्या स्वरचित कवितांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत नाट्यगृह हाऊसफुल्ल होऊन मराठी राजभाषा दिन आणि कुसुमाग्रज यांची जयंती जणू मराठी भाषेचा गौरव उत्सव म्हणून साजरा झाला.

या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली. काव्य मैफिलीत संदीप खरे आणि वैभव जोशी यांनी आपल्या स्वरचित लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी कवितांचे सादरीकरण करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या काव्यप्रदर्शनाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.  

या कार्यक्रमास ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर चिटणीस अमित ओझे, ‘भाजपा महिला मोर्चा'च्या पनवेल शहराध्यक्षा राजेश्री वावेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका वृषाली वावेकर, ‘टीआयपीएल'चे संचालक अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, ‘युवा मोर्चा'चे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, ‘भाजपा सांस्कृतिक सेल'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अमोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ, केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रीतम म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, वैभव बुवा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कराचा भरणा करुन देयक शून्य करपावती सादर करा; अन्यथा कारवाई