नवी मुंबईत २ अनधिकृत शाळा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मार्च, २०२५ अखेर खालील प्राथमिक शाळा शासनाची आणि नवी मुंबई महापालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई.अधिनियम २००९ मधील कलम-१८अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यामुळे संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशी संपर्क साधून नजिकच्या महापालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे. तसेच परवानगी शिवाय सुरू केलेली शाळा तात्काळ बंद करावी, असे महापालिकेच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

अन्यथा संबंधितांविरुध्द बालकांचा मोफत-सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, सदर अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा. जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

संस्थेचे नांव शाळेचे नांव-पत्ता माध्यम शेरा
इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज,
सेक्टर-८ बी, सीबीडी-बेलापूर इंग्रजी न्यायप्रविष्ट (रीट याचिका क्र. ६५६५/२०२३)
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट आग्रीपाडा, मुंबई इकरा इंटरनॅशनल ॲण्ड
मक्तब स्कुल, सेक्टर-२७, नेरुळ इंग्रजी -

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका क्षेत्रात या वर्षापासून ५ सेमी- इंग्लिश स्कुल -आयुक्त गोयल