मनसेचा नेरुळ विभाग कार्यालयावर शिट्टी वाजवा मोर्चा
नवी मुंबई : नेरुळ, जुईनगर परिसर मोठ्या प्रमाणात समस्यांनी वेढला आहे. मागील पाच वर्षांपासून प्रशासनाचा कारभार आहे. या काळात सगळीकडे आरोग्य, अपुरा पाणी पुरवठा, खराब रस्ते-पदपथ, करोडो रुपये खर्च करून बंद पडलेल्या वास्तू अशा शेकडो समस्यांनी विभाग वेढलेला आहे. या समस्यांविरोधात मनसेने मनसे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभाग कार्यालयावर 'शिट्टी मोर्चा' काढला. मोठ्या प्रमाणात समस्या असताना देखील झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना शिट्टी वाजवून महाराष्ट्र सैनिकांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. शेकडोंच्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
नेरुळ, सेक्टर-२, राजीव गांधी पूल ते कुकशेत गाव, नेरुळ विभाग कार्यालय असा शिट्टी मोर्चा काढण्यात आला. "या अधिकाऱ्यांचे करायचे काय... खाली डोकं वर पाय", "पाणी आमच्या हक्काचे... नाही कोणाच्या बापाचे", "नेरुळ स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झालेच पाहिजे", "कंत्राटदार अधिकाऱ्यांचे लागे बांधे...नागरिकांचे रस्त्यावर चालण्याचे झाले वांदे", डांबर कमी खडी जास्त...रस्त्यावर खड्डे भरमसाठ", "अधिकारी झोपा काढत राहिले...बांगलादेशींनी फुटपाथ बळकावले" अशा घोषणांनी महाराष्ट्र सैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
जुईनगर मधील क्रीडा संकुलचा वापर क्रीडा सोडून इतर बाबींसाठी होतो. नेरुळ पूर्व एलपी च्या पुढे रमेश मेटल येथील झोपडपट्टी मधील नागरिकांना पाणी मिळत नाही. जुईनगर, नेरुळ परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिक, लहान मुले आजारी पडत आहेत. सगळीकडे निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. पुरेशी धूर फवारणी व काळजी न घेतल्यामुळे मलेरिया, डेंग्यू ने थैमान घातले आहे. तसेच नेरुळ, सेक्टर-१ मधील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात बसवला. पण त्याचे उदघाटन केले नाही. नेरुळ पूर्व ते जुईनगर सर्व्हिस रोड वर शोरूम वाले अनधिकृतपणे गाड्या पार्क करत आहेत. सेक्टर-३ मध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नाही असे शेकडो प्रश्न मनसेचे सविनय म्हात्रे, अभिजीत देसाई, मनसे विभाग अध्यक्ष यांनी अधिकाऱ्यांना विचारले. बऱ्याच प्रश्नांची अधिकाऱ्यांकडे उत्तरे नसल्याचे दिसून आले. मनसेने उपस्थित केलेले सर्व प्रश्न जर अधिकाऱ्यांनी योग्य वेळेत सोडवले नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन होईल असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
मनसेच्या या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, महिला सेना उपशहर अध्यक्ष अनिथा नायडू, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील, आनंद चौगुले, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, उमेश गायकवाड, निखिल गावडे, विशाल गाडगे, अनिकेत भोपी, प्रविण राऊत, भूषण कोळी, अमोल आयवळे, सागर विचारे, विशाल चव्हाण, विभाग सचिव नितीन मराठे, अर्जुन चव्हाण, अक्षय कदम, निलेश सैदाणे, उपविभागअध्यक्ष पुंडलिक पाटील, राजेंद्र खाडे, शाखाअध्यक्ष मयूर कारंडे, प्रविण शिंदे, संकेत बोडके, सुदेश शेट्टी, प्रणित डोंगरे, चेतन कराळे, जालिंदर पवार, जितेंद्र भरनुके, मुरली नवघरे, दिनेश सेन, गणेश पाटील, प्रमोद डेरे, श्रुतिक जाधव, जितेंद्र भोईर, सुदेश शेट्टी, सचिन नारायणन, अविनाश भिलारे, चंद्रकांत कोळी, प्रकाश कोकाटे, मनविसे शहर सचिव विपुल पाटील, महिला सेना विभाग अध्यक्ष भूमिका म्हात्रे, शीतल दळवी, विदया इनामदार, यशोदा जवळ, सुकेशिनी मोहिते, रागिणी खामकर, अनुष्का देसाई, प्रथम तेलंगे, सचिन दोरगे यांच्या सह मोठया प्रमाणात मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सामान्य नागरिक उपस्थित होते.