२ दिवसांच्या ‘पाणीबाणी'मध्ये आरओ प्लांटचा धंदा तेजीत
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहनांचे वॉशींग सेंटर आणि आरओ पाणी प्लांटच्या दुकानांचे पेव फुटले असून या पाण्याचा स्त्रोत काय? याचा लेखाजेखा काय? असा सवाल दोन दिवसापूर्वी कल्याण पश्चिम भागातील महंमद अली चौक परिसरात फुटलेल्या पाण्याचा लाईनमुळे पाणी बाणी समस्येमुळे बाटली बंद पाणी, पाण्याचे जार यांना मागणी वाढल्याने जाणकारांकडून केला जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात वाहनांचे वॉशींग सेंटर, तसेच आरओ प्लांटच्या माध्यमातून पाणी बाटला, जार आदिंद्वारे मधून पाणी विक्री केले जाते. महापालिका क्षेत्रात ‘केडीएमसी'मार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सेवा या तत्वावर केला जात असून पाणी गळती वितरण वाहिन्यांमध्ये झाल्यास तातडीने दुरुस्ती केली जाते. पंरतु, पाणी चोरी शोधावी लागते, पाणी पुरवठा लाईनला अनधिकृत जोडणी करुन थेट पाणी चोरी केली जाते. पाणी पुरवठा विभाग अशा अनधिकृत जोडण्यावर कारवाईचा बडगा उगारते आणि पाणी पुरवठा बंद केला जातो.
एकीकडे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्यावरुन कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे शेवटच्या ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागते, अशी ओरड नेहमी होत असते. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २७ गावे क्षेत्रासह दरदिवशी सुमारे ४२० एमएलडी पाणी पुरवठा वितरण वाहिन्या तसेच टँकरमार्फत पाणी पुरवठा महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत केला जातो. असे चित्र असताना सुमारे ६०० रुपये भरून टँकरने मागणीनुसार पाणी पुरवठा केला जातो. दोन दिवसाच्या पाणीबाणी समस्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात राजकीय मंडळी सक्रिय होती.
यानिमित्ताने माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पाणी पुरवठा लाईन फुटल्याने सदर परिसरात लाईन बंद करुन दुसऱ्या परिसरातील लाईनद्वारे पाणी वळवून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रशासनाकडे नियोजन नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे. दोन दिवसाच्या ‘पाणीबाणी'मुळे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रातील वाहन वाँशिंग सेंटर, आरओ प्लांट माध्यमातून पाणी विक्री करणाऱ्या दुकानांचे पाणी स्त्रोत काय? अशी माहिती प्रभागस्तरावर मागविली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील वाहन वाशिंग सेंटर तसेच आरओ पाणी प्लांट पाणी विक्री दुकाने महापालिकेच्या रडारवर येणार असल्याचे समजते.