खारघर मधील गीतांजली टॉवर मध्ये आग; वीज वाहिन्या जळून खाक

खारघर : खारघर सेक्टर-३४ मधील गीतांजली टॉवर मधील डक मध्ये लागलेल्या आगीत विद्युत वाहिन्या जळून खाक झाल्या आहेत. यावेळी टॉवर मध्ये सर्वत्र धूर पसरल्यामुळे चक्कर येणाऱ्या व्यक्तीवर जागीच प्रथमोपचार करण्यात आले. दरम्यान, आगीत वीज वाहिन्या जळून गेल्याने  लिपट तसेच पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे  टॉवरमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खारघर सेक्टर-३४ सी मध्ये १९ मजल्याची गीतांजली टॉवर इमारत आहे. ४ जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास गीतांजली टॉवर मधील दुसऱ्या मजल्यावर डक मध्ये लागलेल्या आगीमुळे धूर पसरल्यावर जागृत नागरिकांनी खारघर अग्निशमन केंद्राला माहिती दिली. आगीत सर्व मजल्यावरील डक मधील वीज वाहिन्याना आग लागल्याने टॉवर मध्ये सर्वत्र धूर पसरल्यामुळे काहींना चक्कर येऊ लागल्याने वेळीच रुग्णवाहिका बोलविण्यात आली. चवकर येणाऱ्या व्यक्तीस रुग्णवाहिकेत प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, डक मध्ये लागलेल्या आगीमुळे काही घरांच्या खिडक्यांचा काचा फुटल्याचे रहिवाशांनी सांगितले. आगीची घटना रात्रीच्या वेळी झाली असती तर मोठी दुर्घटना टळली असती.

दरम्यान, गीतांजली टॉवर मधील डक मध्ये लागलेल्या आगीमुळे इमारत मधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सोसायटी मधील सर्व जिने रिकामे ठेवणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गीतांजली टॉवर मधील प्रत्येक मजल्यावरील डक उघड्या अवस्थेत होते. डक बंद असते तर सर्व वीज वाहिन्या जळून खाक झाल्या नसत्या. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास जिन्यात ठेवण्यात आलेले साहित्य अडचणीचे ठरु शकते. त्यामुळे प्रत्येक सोसायटी मधील सदस्यांनी जिना मोकळे ठेवणे आवश्यक आहे, असे खारघर अग्निशमन अधिकारी सौरभ पाटील यांनी सांगितले.

खारघर मधील बहुतांश भागातील एमटीएनएल दूरध्वनी सेवा बंद झाली आहे. आगीची घटना घडल्यामुळे नागरिक गुगलवर संपर्क क्रमांक सर्च करतात. मात्र, जुने दूरध्वनी क्रमांक बंद झाले आहेत. त्यामुळे खारघर मधील नागरिकांनी खारघर अग्निशमन केंद्रात सोबत जोडलेल्या  २२६९३६५७००/२२६९३६५७०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खारघर अग्निशमन केंद्राद्वारे करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली डेपोत आग; ४ एनएमएमटी बस जळून खाक