वीज बिलाबाबत मुख्यमंत्र्यांकडून एप्रिल फुल
कल्याण : ‘महावितरण'च्या वतीने डोंबिवली मधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना नवीन इलेक्ट्रॉनिक टीओडी मीटर बसवण्यासंबंधी नोटीसा पाठवण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष' डोंबिवली शहर विभागाच्या वतीने जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ‘महावितरण'च्या तेजश्री कार्यालय येथे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा आणि अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांची भेट घ्ोऊन निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, महिला जिल्हा संघटिका वैशाली दरेकर-राणे, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, डोंबिवली पश्चिम शहर प्रमुख, डोंबिवली पूर्व शहर प्रमुख अभिजीत सावंत, विजय भोईर, विभाग प्रमुख श्याम चौगुले, प्रमोद कांबळे, अर्जुन मौर्य, राजेंद्र सावंत, तसेच शिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले, इतर आश्वासनाप्रमाणे वीज बिलाबाबात मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचा एप्रिल फुल केला आहे. वीज बिल १० टवव्ोÀने कमी झाली नसून दिलेली वचने जनतेची फसवणूक ठरत आहेत. तसेच या सर्व मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.