स्पर्धेतील दुर्घटनेवेळी आयुक्तांची संवेदनशीलता

भाईंदर : महाराष्ट्र शासनाच्या ‘पर्यावरण-वातावरणीय बदल विभाग'ने सुरु केलेले ‘माझी वसुंधरा' अभियान एक व्यापक उपक्रम आहे, जे निसर्गाच्या पाचही घटकांवर (पृथ्वी, पाणी, हवा, ऊर्जा, आकाश) लक्ष केंद्रित करते. यामुळे पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता यावर भर दिला जातो. यावर्षी देखील महाराष्ट्र शासनातर्फे ‘माझी वसुंधरा ५.०' अभियान राबविण्यात येत आहे. त्यास अनुसरुन मिरा-भाईंदर शहरात सदर अभियान आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत ४ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘वसुंधरा महोत्सव-२०२५' साजरा करण्यात आला. ‘वसुंधरा महोत्सव' अंतर्गत शेवटच्या दिवशी ‘किल्ला सायक्लोथॉन' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

‘किल्ला सायक्लोथॉन'मध्ये सहभागी स्पर्धकाचे उत्तन येथील तारोडी भागात सायकलवरील नियंत्रण सुटल्याकारणाने दुर्दैवीी अपघात घडला. या घटनेची दखल आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी तात्काळ घेतली. आयुक्त शर्मा स्वतः घटनास्थळी रुग्णवाहिका येईपर्यंत जखमी स्पर्धकासोबत उभे होते. यानंतर जखमी स्पर्धकाला रुग्णवाहिकेत बसविल्यानंतर त्याला भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी रुग्णालयात व्यवस्थित उपचार सुरु होईपर्यंत आयुक्त या स्पर्धकाच्या प्रकृतीचा सातत्याने आढावा घेत होते. यामध्ये आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी त्यांच्यातील संवेदनशीलता दाखवली.

दरम्यान, अशा प्रकारची घटना यापुढे घडणार नाही याबाबत संपूर्ण दक्षता घेण्याबाबत आयुक्त शर्मा यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

Read Previous

शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

Read Next

शौर्या अंबुरे आशियाई स्पर्धेत चमकली