कल्याण पूर्वेत ‘डम्पिंग ग्राऊंड'ला विरोध

कल्याण : कल्याण पूर्व भागातील १०० फुटी रोड, वसंत वाटीका जवळील महापालिकेच्या भूखंडावर निर्माणाधिन डम्पिंग  ग्राऊंड विरोधात स्थानिक रहिवाशी रस्त्यावर उतरले.

कल्याण पूर्वेतील १०० फुट रोड, शिवरल चौक येथे कल्याण-डोंबिवली महापालिका मलनिःस्सारण आरक्षण क्र.३३० येथे होत असलेल्या कचरा एकत्रीकरण, प्रेसिंग कचरा वाहतूक आणि कचरा वाहतूक गाड्यांचे वाहनस्थळ या प्रकल्पास स्थानिक रहिवाशांचा विरोध असून या प्रकल्पाविरोधात रहिवाशी आक्रमक झाले आहेत. डम्पिंग ग्राऊंडचा प्रकल्प मानवी वस्ती पासून दूर स्थलांतर कराण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जोरदार निदर्शने केली.

याबाबत ‘आम आदमी पार्टी'चे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगिते की, ‘कल्याण-डोंबिवली महापालिका'ने कल्याण पूर्वेतील आरक्षण क्रं.३३० नुसार मलनिःस्सारण, पाणी पुरवठा, उद्यान या ऐवजी आरक्षणात बद्दल करुन घनकचरा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे. याबाबत ‘केडीएमसी'ने नागरिकांकडून हरकती-सूचना मागविल्या होत्या का? बेकायदेशीरपणे होत असलेल्या घनकचरा प्रकल्पाला आमचा विरोध असून, नागरी आरोग्याच्या दुष्टीकोनातून या परिसरात तो प्रकल्प होणार नाही. विकासला आमचा विरोध नसल्याचे आंदोलनकर्त्या रहिवाशांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कचरा उचलणाऱ्या कामगाराला भटक्या कुत्र्याचा दंश