‘महावितरण'ची वीज चोरांविरुध्द धडक कारवाई
मुंबई : ‘महावितरण'ची वीज वितरण हानी कमी करण्यासाठी विशेष मोहीम भांडुप परिमंडलात राबविण्यात येत आहे. याकरिता वीज जोडणी तपासणी, वीज मीटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरु असतात. या तपासणीमध्ये भांडुप परिमंडलात एप्रिल ते जुलै २०२५ या ३ महिन्यात विद्युत कायदा २००३ च्या कलम १२६ व कलम १३५ अंतर्गत एकूण ८८९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. तसेच ५ कोटी ९४ लाखाचा दंडही आकारण्यात आला आहे.
आपल्या ग्राहकांना किफायतशीर दराने वीजपुरवठा करण्यासाठी ‘महावितरण'चे कर्मचारी ऊन, पाऊस, वाऱ्यात काम करत असतात. तसेच ग्राहकांना अखंडीत आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी झटत असतात. परंतु, अशा बेकायदेशीररित्या वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांमुळे अधिकारी-कर्मचारी तसेच प्रामाणिक ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.
मीटर मध्ये फेरफार करणे, रिमोटद्वारे वीजचोरी करणे अथवा वीज तारांवर काटा टाकून वीजचोरी केली जाते. दरम्यान, महावितरण भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी वीजचोरांविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व ग्राहकांना प्रामाणिकपणे वीज जोडणी घेऊन वीज वापर करण्याचे तसेच वीज वापराचे अनियमीतत करणाऱ्या अथवा चोरी करणाऱ्या ग्राहकांची माहिती ‘महावितरण'ला कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्राहकांनी नियमितपणे वीज बिल भरुन ‘महावितरण'ला सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.
मंडळ वापरातील अनियमितता वीजचोरी प्रकरणे
प्रकरणे-दंड रक्कम (लाखात) दंड रक्कम (लाखात)
वाशी ३६ १३.१९ ३०९ २४३.०९
ठाणे ४८ ३६.४ ३२९ २११.५१
पेण ३६ २२.३९ १३१ ६६.७३