कल्याण-डोंबिवलीत मोकाट कुत्र्यांचा चार महिन्यात ८ हजार ७८९ नागरिकांना चावे

वर्षांला 1 कोटी 18 लाख 68 हजार रुपये खर्च

कल्याण : केडीएमसी क्षेत्रात भटक्या मोकाट कुत्र्याचा उच्छाद सुरू असून चार महिन्यात 8 हजार 789 जणांना कुत्रा चावल्याचे सामारे आल्याने केडीएमसी क्षेत्रातील भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून एप्रिल ते जुलै या अवघ्या चार महिन्यांत तब्बल ८ हजार ७८९ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, कुत्रा पकडून निर्बजीकरण मोहीम राबवित त्यांचे निर्बजीकरण पुनश्च सोडले जाते. भटक्या मोकाट कुत्र्याचे निर्बजीकरण करीत भटक्या मोकाट कुत्र्याच्या संख्येला वाढीला आळा घालण्यासाठी आणि नियंत्रणासाठी महापालिकेने एका एजन्सीकडे हे काम दिले असून एका कुत्र्यमागे 989 रुपये खर्च केला जात असून वर्षांला साधरण 1 कोटी 18 लाख 68 हजार रुपये खर्च केला जात आहे. तरी भटक्या मोकाट कुत्र्याची संख्या वाढत आहे. प्रशासकिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसी क्षेत्रात 90हजार हून अधिक कुत्र्याची संख्या असून ,पशुगणना अवहालाचे काम सुरू असून अवहालाअंती कुत्र्यांच्या  संख्येची आकडेवारी मिळेल.

या भटक्या मोकाट कुत्र्याचा टोळी उच्छादाने बालके, जेष्ठ नागरिकांसह तरुणाईसह सर्वसामान्य देखील हैराण पेरशान झाले आहेत. तर जाणाकारांच्या मते भटक्या मोकाट कुत्र्यांना सहाजासहजी मिळणारा अन्न पुरवठा हा देखील त्यांच्या वाढीस पोषक ठरत आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उंच मनोरे; पण सुरक्षिततेचा पाया भक्कम