‘स्व. जनार्दन भगत सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत' पुरस्काराने चिंध्रण ग्रामपंचायत सन्मानित

पनवेल : कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय ‘स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा-२०२५' पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स मध्ये ७ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर होते.

राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते, हिच समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली. त्यामुळेच समाजकार्याला महत्व मिळाले, असे प्रतिपादन यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.

लोकनेते दि. बा. पाटील यांनी स्व. जनार्दन भगत यांना आणि त्यांनी आम्हा सर्वांना घडवले. स्व. जनार्दन भगत साहेबांची शिकवणी मोठी होती आणि ती आम्ही अंगिकारली. ग्रामस्वच्छता, शिक्षण आणि न्यायावर त्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर, फुले यांच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता. त्याचबरोबर संघटन त्यांचा आत्मा होता. अनिष्ठ प्रथांना त्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्याच धर्तीवर वायफळ खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्य, गरजवंतांना मदत करणे चांगले आहे, त्या अनुषंगाने सर्वानी कार्यरत रहावे, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.

या समारंभात प्रास्ताविक करताना ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी स्व. जनार्दन भगत यांच्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला.

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे,  रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, आमदार महेश बालदी, स्व. भगतसाहेबांच्या कन्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर, ‘दिबां'चे सुपुत्र अतुल पाटील, उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, पांडुशेठ घरत, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ'चे सचिव परेश ठाकूर, ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'च्या कार्यकारी मंडळ सदस्या वर्षा ठाकूर, अनिल भगत, संजय भगत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपा पदाधिकारी आणि हजाराेंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

समारंभात सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदिका समीरा गुजर, आकाश पाटील, सागर रंधवे यांनी तर आभार प्रदर्शन वाय. टी. देशमुख यांनी केले.

‘स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५' पारितोषिक
- प्रथम क्रमांक : चिंध्रण ग्रामपंचायत (१ लाख रुपये, सन्मानचिन्ह)
- द्वितीय क्रमांक : विचुंबे ग्रामपंचायत (५० हजार रुपये, सन्मानचिन्ह)
- तृतीय क्रमांक : गव्हाण ग्रामपंचायत (२५ हजार रुपये, सन्मानचिन्ह)
- उत्तेजनार्थ : करंजाडे आणि तुराडे ग्रामपंचायत (प्रत्येकी ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह)
शिक्षण, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव
-शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष (पुरस्कार स्वरुप - १ लाख रुपये)
- चांगू काना ठाकूर इंग्रजी माध्यम (प्राथमिक विभाग) विद्यालय, नवीन पनवेल.  
- श्रावणी थळे, चांगू काना ठाकूर इंग्रजी माध्यम (माध्यमिक विभाग) विद्यालय, नवीन पनवेल.
- स्वस्तिक भोसले, चांगू काना ठाकूर इंग्रजी माध्यम (माध्यमिक विभाग) विद्यालय, नवीन पनवेल.
- रिया मौर्य, चांगू काना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल.
- श्रीमती भागुबाई चांगू काना ठाकूर विद्यालय, द्रोणागिरी.
- दीप संजय दांगडे, मोरु नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय, गव्हाण कोपर.
- रिषीत गुप्ता, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल, खारघर.
- रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर. (रोख पारितोषिक एक लाख रुपये).
 - शिवसुंदर रमेश साहो, रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारघर.
- ॲड. ऋषिकेश पाटील, भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय.
- आरव सिंग, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल, उलवे.
- धैर्य किशोर पाटील, क्रिकेटपटू.
- रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालय, खारघर ओवेपेठ.(पारितोषिक एक लाख रुपये).
- श्वेता भार्गव ठाकूर, माजी विद्यार्थी - चांगू काना ठाकूर विद्यालय, नवीन पनवेल. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

काँक्रिटीकरण कामामुळे ठाणे-बेलापूर रस्त्याची एक मार्गिका आठवड्यासाठी पूर्णपणे बंद