नवी मुंबईत ई-कचरा संकलन

नवी मुंबई  : घनकचरा व्यवस्थापनमध्ये नागरिकांनी कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करुन महापालिकाकडे प्रक्रियेसाठी द्यावे याबाबत नवी मुंबई महापालिका आग्रही असून त्यादृष्टीने व्यापक जनजागृती करून कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने ई-कचरा अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा कचरा वेगळा संकलित करण्याकडेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे.

ई-कचरा संकलनासाठी महापालिका मार्फत वेगळे वेळापत्रक बनविण्यात आले असून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई आणि थ्रेको कंपनी यांच्या सहकार्याने, ई-वेस्ट रिसायकलींग मोहीम असा अभिनव उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. बहुतांशी नवी मुंबईकर नागरिकांनाही दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ई-कचरा संकलित करण्यात येतो याची माहिती झाली असून आपल्या घराजवळून ई-कचरा संकलित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

  प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ई-वेस्ट संकलन मोहीम व्यापक स्वरुपात राबविली जात असून याचा लाभ वैयक्तिक पातळीवर नागरिक, गृहनिर्माण संस्था तसेच औद्योगिक आणि इतर संस्था यांच्याकडून घेतला जात आहे.

ई-वेस्ट संकलनासाठी महापालिकेच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन जारी करण्यात आलेल्या क्यू आर कोडद्वारे अथवा https://docs.google.com/forms/d/1-qBd5HS-OA5Bp4413z6H-R2X0_bccQyVGP87c1Tyz4k/edit?chromeless=1 या गुगल लिंकमधील फॉर्मवर आपले नांव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि आपल्याकडील ई-कचऱ्याची माहिती नोंदविल्यास आपल्याकडील ई-वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) गोळा करण्यासाठी आपण दिलेल्या पत्त्यावर अगदी दरवाजापर्यंत वाहन येऊन ई-वेस्ट संकलित केले जाते.

इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची सुरक्षित आणि जबाबदारीने विल्हेवाट लावणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे, असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून १८ मे रोजी ई-वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, सदर मोहिमेद्वारे नवी मुंबईकर नागरिकांना मोबाईल, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, चार्जर, बॅटऱ्या यासारख्या वापरात नसलेल्या आणि टाकून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पर्यावरणशील पध्दतीने पुनर्प्रक्रिया करण्यासाठी महापालिकाकडे देण्याची संधी मिळत असून या माध्यमातून पर्यावरणस्नेही योगदान देण्याची एक चांगली संधी मिळत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील स्वच्छता आणि पर्यावरणप्रेमी जबाबदार, सोसायट्या, विविध संस्था, औद्योगिक संस्था, संघटना यांनी या पर्यावरणपूरक मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि नवी मुंबईच्या स्वच्छता-पर्यावरणशीलतेसाठी अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कँलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

धरण उशाला अन्‌ कोरड घशाला