महावितरण भांडूप परिमंडलात रन फॉर सेफ्टी' मॅरेथॉन संपन्न
ठाणे : ‘महावितरण'च्या वर्धापन दिन निमित्ताने ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र' अशी संकल्पना घेऊन १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘विद्युत सुरक्षा सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्ग १ जून रोजी भांडूप परिमंडलात ‘रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या ‘मॅरेथॉन'मध्ये ‘महावितरण'चे कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि उत्साही धावपटुंचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
याप्रसंगी भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता संजय पाटील, मुख्यालयातून विशेष उपस्थिती नोंदविणारे महाव्यवस्थापक (मा.सं) राजेंद्र पांडे, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, भांडूप परिमंडलाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (वि व ले) प्रवीण रहांगदळे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश वाणी, ठाणे मंडळातील सर्व कार्यकारी अभियंता आणि इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भांडूप परिमंडलात ‘रन फॉर सेफ्टी मॅरेथॉन' ३ कि.मी. आणि ५ कि.मी. या दोन गटात विभागण्यात आली. ठाणे येथील विविआना मॉल येथून हनुमान चौक ते बेथनी हॉस्पिटल पासून उपवन तलाव पर्यंत ‘मॅरेथॉन'चे अंतर होते. या ‘मॅरेथॉन'मध्ये कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून ७०० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. मुख्य अभियंता संजय पाटील यांनी पलॅग ऑफ करुन ‘मॅरेथॉन'ची सुरुवात केली. ‘मॅरेथॉन'च्या माध्यमातून विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ठाणे मंडळचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम, मंडळातील कार्यकारी अभियंता तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.