कल्याण आरटीओ क्षेत्रात रिक्षा भाडेवाढ लागू

कल्याण : कल्याण आरटीओ क्षेत्रात रिक्षा भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मीटर भाड्यात ३ रुपये वाढ तर शेअर भाड्यात ३ ते ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाची भाडे वाढ ४ महिन्यापूर्वी सरकारने दिली आहे. पूर्वी रिक्षाचे मीटर भाडे २३ रुपये होते. त्यात आता ३ रुपये वाढ करुन ते २६ रुपये करण्यात आले आहे.

प्रवाशांवर बोजा पडू नये म्हणून आम्ही भाडेवाढ लागू केलेली नव्हती. रिक्षा मीटरचे रिकॅलीब्रेशन होणे बाकी होते. आत्ता ९५ टक्के काम  झाले आहे. वाहतूक शाखेकडून ओवर सीटवर कारवाई सुरु केली आहे. १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जात असून ते अन्यायकारक आहे. याबाबत सरकारकडे दाद मागणार असून भाडेवाढ प्रत्येक रुट आणि शहरात झाली आहे. शेअर रिक्षात ३ ते ४ रुपये भाडे वाढ करण्यात आलेली आहे. महागाई प्रत्येकाला आहे. त्यानुसार भाडेवाढ सरकारने दिली असून  प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन ‘रिक्षा-टक्सी चालक-मालक संघटना'चे उपाध्यक्ष संतोष नवले यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विमानतळाला दिबांच्या नावासाठी पुन्हा एल्गार