मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते खोट्या मतदारांच्या प्रदर्शनाचे वाशी येथे उद्घाटन

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी १२७ मतदारांची नोंद, सुलभ शौचालय मध्ये मतदाराची नोंद आणि पाम बीच वर २५० मतदारांची नोंद असे घोळ मनसेने समोर आणले. अशाच मतदार यादीतील निवडणूक आयोगाच्या अनेक धक्कादायक बाबींचा घोळ असणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे ७ नोव्हेंबर रोजी वाशी येथे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले. मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी हे प्रदर्शन भरवले होते. 

नवी मुंबईतील मतदार यादीतील २० घोळ या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर अमित ठाकरे  संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणाले "मी आजवर अनेक प्रदर्शनांना गेलो आहे. पण, आजच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन करताना मला अतिशय वाईट वाटले. सगळी माहिती पाहून मी थक्क झालो. प्रदर्शन म्हणजे प्रत्येक मतदाराच्या गालावर एक चपराक आहे. गजानन काळे आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन. त्यांनी जी गोष्ट निवडणूक आयोगाने बघायची टाळली ती लोकांसमोर आणली. निवडणूक आयोग काही सुधारणार नाही, त्यांनी जानेवारीत निवडणुका घ्यायचंच ठरवले आहे. तेव्हा आता आपल्याला अजून चुका शोधायच्या आहेत. आणि एवढं लक्षात ठेवा, प्रत्येक खरा मतदार मैदानात उतरला पाहिजे. कारण राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बोगस मतदारांसाठी आम्ही योग्य ती ’सोय’आधीच करून ठेवली आहे.

या प्रदर्शनात कोपरखैरणे मध्ये एकाच मोबाईल क्रमांकावर तब्बल २८८ मतदारांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तर एकाच घरात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा विविध धर्मातील लोक राहत असल्याचे आढळून आले. सीवूड्स मध्ये यादी क्रमांक ३३६ मध्ये करावे गाव तलावाच्या शेजारी शेकडो लोक राहत असल्याचे आढळून आले. तलावाच्या काठावर मगरी राहतात, मग मतदार कधी पासून राहायला लागले असा उपरोधिक टोला मनसेने लगावला.

 बेलापूर विधानसभा मध्ये यादी क्रमांक ३०१ मध्ये अनु क्र ९९८ असणाऱ्या एका मतदाराचा पत्ता गजानन महाराज मंदिर आहे, तर ऐरोली विधानसभा मध्ये यादी क्रमांक ३ आणि अनु क्र. १०२ असणाऱ्या मतदाराचा पत्ता आदर्श हिंदी विद्यालय आहे. अशा चक्रावून टाकणाऱ्या बाबी पाहून नवी मुंबईकर निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत होते. तर निवडणूक आयोग लोकशाहीचा हत्या करत असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. 

या प्रदर्शनास शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हाप्रमुख रंजना शिंत्रे, प्रभारी अतुल कुलकर्णी यांनी सुद्धा भेट दिली. तर मनसे प्रवक्ते व शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्यासह मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, विनोद पार्टे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, शरद दिघे, दिनेश पाटील, मनसे महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, वाहतूक सेना सरचिटणीस नितीन खानविलकर, मनसे विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे, सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, रस्ते आस्थापना शहरअध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहरअध्यक्ष अनिकेत पाटील, महिला सेना उपशहरअध्यक्ष अनिथा नायडू, दिपाली ढवूल, सोनिया धानके, शहरसचिव यशोदा खेडसकर, मनसे विद्यार्थी सेना उपशहरअध्यक्ष प्रतिक खेडकर, मनसे विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, सागर विचारे, शाम ढमाले, चंद्रकांत मंजुळकर, योगेश शेटे, अक्षय भोसले, चंद्रकांत डांगे, भूषण आगिवले, नितीन नाईक, विशाल चव्हाण, भूषण कोळी, अमोल आयवळे, उमेश गायकवाड, निखिल गावडे आणि सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृतपणे पाणी उपसा