किशोरवयीन मुलांना धूम्रपान, ई-सिगारेटच्या धोक्यांबद्दल जागरुक करणे गरजेचे

नवी मुंबई :  किशोरवयीन मुलांमध्ये धुम्रपान आणि ई-सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. किशोरवयीन मुले या सवयी एक ट्रेंड म्हणून स्विकारतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. सर्वात आधी पालकांनी स्वतःला याबाबत शिक्षित करणे आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यास होणाऱ्या दुष्परिणामांविषयी मुलांशी मनमोकळा संवाद साधणे गरजेचे आहे.

धुम्रपान आणि ई-सिगारेटचे व्यसन केवळ प्रौढांमध्येच नाही तर किशोरवयीन मुलांमध्येही सामान्यपण आढळून येत आहे. किशोरवयीन मुलांमध्ये धुम्रपान आणि ई-सिगारेटच्या सवयीच वाढ होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. ई-सिगारेट सारख्या साधनांची आकर्षक रचना, विविध प्राकरचा चवींची उपलब्धता आणि दिवसेंदिवस त्याचे वाढते मार्केटिंग सदर उत्पादने १३-१९ वयोगटातील तरुणांना आकर्षक बनवतात. त्याचप्रमाणे समवयस्क मित्रांचा दबाव, म्हणजेच प्रौढ दिसण्याची किंवा प्रौढांमध्ये उठ-बस करण्याची इच्छा किशोरवयीन मुलांना तंबाखू उत्पादनांच्या सेवनास भाग पाडते. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म किशोरवयीन मुलांमध्ये धुम्रपान आणि ई-सिगारेटसारख्या व्यसनाला आकर्षक ठरविण्यास भाग पाडते. बरीच किशोरवयीन मुले आता सिगारेट, ई-सिगारेट, धूररहित तंबाखू आणि हुक्का यांचा सर्रासपणे वापर करतात. केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही किशोरवयीन मुलांमध्ये धुम्रपान आणि ई-सिगारेटचे व्यसन वाढल्याची प्रतिक्रिया डॉ. शाहिद पटेल (फुपफुसविकार तज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर) यांनी स्पष्ट केले.

१३ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धुम्रपान आणि व्हेपिंगशी संबंधित धोक्यांबाबत शिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे. किशोरावस्थेत निकोटीनच्या सेवनाने मेंदुच्या विकासात अडथळ येऊ शकतो, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे, शिक्षण घेणे आणि वैयक्तिक विकासात परिणाम होतो. धुम्रपान किशोरवयीने मुलांमध्ये फुपफुसांच्या विकासास हानीकारक ठरते, ज्यामुळे फुपफुसांची कार्यक्षमता कमी होते आणि दमा, ब्राँकायटिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा धोका वाढतो. यामुळे वीएएलआय-व्हेप असोसिएटेड लंग इंज्युरी नावाचा एक नवीन आजार आढळून येऊ लागला आहे. या आजाराचा आतापर्यंत कोणताही इलाज नसून याचा मेंदूच्या विकासावर, स्मरणशक्तीवर, एकाग्रतेवर आणि एकूणच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे डॉ. शाहिद पटेल म्हणाले.

वास्तविक पाहता पालकांनी तंबाखू, निकोटीन आणि हल्ली किशोरवयीन मुले वापरत असलेल्या व्यसनांच्या पर्यायाबाबत स्वतःला शिक्षित केले पाहिजे. धुम्रपान त्यांना तात्पुरते समाधान देऊ शकते. परंतु, श्वसन आरोग्यावर वाईट परिणाम करु शकते. यासाठी पालकांनी मुलांना व्यसन सोडण्याकरिता असलेल्या सपोर्ट ग्रुप किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी. धुम्रपान आणि व्हेपिंगमुळे गंभीर व्यसन आणि आरोग्यासंबंधी दीर्घकालीन समस्या उद्‌भवतात. या वाईट सवयी वेळीच सोडणे मुलांच्या भविष्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकते, अशी माहितीही डॉ. पटेल यांनी दिली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लग्नपत्रिका झाली ऑनलाईन, डिजीटल पत्रिकेचा ट्रेंड