नवी मुंबई मधील नाल्यांमध्ये अजूनही गाळ?
वाशी : नवी मुंबई महापालिका मार्फत नवी मुंबई शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व सफाई केली जाते. त्यासाठी यंदा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १५ मे २०२५ अंतिम मुदत दिली होती. मात्र, सदर मुदत संपून देखील औद्योगिक वसाहतीसह नवी मुंबई शहरातील नैसर्गिक नाले अजूनही गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे या नाल्यांची सफाई कधी होणार?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई शहरातील डोंगर पायथ्यापासून खाडीला मिळणारे अनेक मोठे नैसर्गिक नाले आहेत. या नाल्यांची साफ सफाई करण्याची जबाबदारी महापालिका स्थापत्य विभागाने घेतली आहे. तर मान्सून पूर्व नालेसफाई सह, धोकादायक वृक्ष तोड, खोदकाम पूर्ण विराम देणे आदी कामांसाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १५ मे २०२५ अंतिम मुदत देत सर्व कामे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सदर मुदत संपून देखील औद्योगिक वसाहती सह नवी मुंबई शहरातील काही नाल्यांची अजूनही सफाई न केल्याने नाले गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे या नाल्यांची सफाई कधी केली जाणार?, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. याबाबत नवी मुंबई महापालिका शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.