दिल्ली येथील साहित्य संमेलनात सौ. ऋतुजा रवींद्र गवस यांचे कविता सादरीकरण
नवी मुंबई : दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सानपाडा येथील कवयित्री सौ. त्रतुजा गवस यांनी माझी कविता या शीर्षकाच्या कवितेचे सादरीकरण केले. एक हजार कवितांमधूल निवड चाचणीद्वारे काही कवींची निवड करण्यात आली. त्यात सौ.ऋतुजा रविंद्र गवस ह्यांच्या सदर कवितेचा समावेश होता.
यानिमित्त सौ. गवस यांनी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सौ. गवस या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.