पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी समारोहाची सांगता
नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून तसेच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीच्या समारोहाची सांगता निमित्त वाशी येथील सेक्टर- ७ जागृतेश्वर शिव मंदीर येथे नवनिर्वाचित नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबई जिल्हा भाजपा तर्फे ‘शिव महाआरती' आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी भगवान शंकराची ‘महाआरती' केल्यानंतर भगवान शंकराच्या नथमस्तक होऊन पूजा अर्चा केली.
अहिल्यादेवींची जयंती गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ भाजप आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप कार्यकर्त्यांनी पोहोचवली. प्रजा हितदक्ष शासन, महिला सबलीकरणासाठी अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेला पुढाकार, न्यायप्रिय आणि धर्माभिमानी वृत्ती, सर्वसमावेशकता या गुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवा भारत घडवत आहेत. सर्वसामान्यांच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मोठे कार्य केले. अनेक ठिकाणी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी बांधून दिल्या. उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोईच्या सुविधा, धर्मशाळा आश्रय शाळा बांधल्या, त्यांच्या कार्यामुळेच त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. अतिशय दानशूर, कर्तुत्ववान, धर्मपरायण, कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे, असे मनोगत यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यवत केले.
याप्रसंगी रामचंद्र घरत, अनिल कौशिक, राजू शिंदे, कोकण विभाग संयोजक अभिजीत पेढणेकर, गोपाळराव गायकवाड, राजेश रॉय, काशीनाथ पाटील, राखी पाटील, नंदकुमार पाटील, दत्ता घंगाळे, राजू तिकोने, नवी मुंबई जिल्हा नवनियुक्त मंडळ अध्यक्ष तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग आणि असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.