हिंदी भाषा लादाल तर शाळा बंद करु - राज ठाकरे
भाईंदर : कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. शांतपणे रहा, मराठी शिका, मस्ती करणार असाल तर दणका बसणारच, असा सज्जड दम मराठी भाषा न बोलणाऱ्यांना देत, हिंदी भाषा लादाल तर शाळा बंद करु, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोड येथील जाहीर सभेत दिला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी भाषेसाठी तीव्र लढा देण्याचे संकेत दिले आहेत.
मिरा-रोड येथे पोलिसांनी मराठी भाषिकांना मोर्चासाठी न दिलेली परवानगी, त्यानंतर निघालेला भव्य मोर्चा, विधानसभा अधिवेशनासह संपूर्ण महाराष्ट्रात उठलेल्या वादळानंतर नित्यानंद नगर भागातील ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या विधानसभा क्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी १८ जुलै रोजी संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.
‘मुंबई'ला ‘महाराष्ट्र'पासून वेगळे करण्यासाठी हिंदी भाषा लादण्याची चाचपणी सुरु आहे. मुंबईला लागूनच असलेले मिरा भाईंदर, वसई, विरार ते थेट पालघर पर्यंत विकसित होणारा पट्टा मराठी भाषिकांना दूर ठेऊन इतर भाषिकांचा मतदार संघ निर्मितीचा डाव सुरू असून मुंबई गुजरातला जोडण्याचे हे षडयंत्र आहे. त्याला हिंदी भाषिक प्रसिध्दी माध्यमांची साथ मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. हिंदी भाषेमुळे फक्त नटनटी यांच्याशिवाय कोणाचाही फायदा झाला नाही. हिंदी भाषेमुळे २५० इतर भाषा मारल्या गेल्या आहेत. आमची सत्ता राज्यावर नसली तरी रस्त्यावर आहे. त्यामुळे मराठी भाषेसाठी कोणतीही तडजोड नाही. त्यामुळे इयत्ता १ली ते ५वी मध्ये हिंदी भाझा आणण्याचा प्रयत्न झाला तर दुकाने नाही आता शाळा बंद करु, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
मराठी माणसांनी षडयंत्र नीट समजून घ्ोतले पाहिजे. मुंबईला हात लावायचा असेल तर या ठिकाणचे मिरा-भाईंदर पासून ते पालघर पर्यंतचे सर्व मतदारसंघ यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत. मी गेली २० वर्षे ओरडून, बोंबलून बोंबलून सांगतोय. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसे येतात. नुसती माणसे येत नाहीत तर ते मतदारसंघ बनवत आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी यावेळी व्ोÀला.
मराठी द्रोही मंडळी मतदारसंघ बनवून तुम्हाला लांब फेकून देणार आणि नंतर सांगणार आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचाच महापौर असे करुन ते मुंबईपर्यंत पोहोचणार. अख्खाच्या अख्खा पट्टा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरु आहेत. मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप करतानाच सदर प्रकार पूर्वीपासून सुरु आहे. त्यांनी पूर्वी जाहीरपणे सांगितले होते. पण, आज लपूनछपून सर्व गोष्टी सुरु आहेत. काय षडयंत्र आहे ते आपण नीट ओळखा, समजून घ्या. तुमच्या अंगावर येतात आणि बोलतात मराठी नाही बोलणार, तो माज तिथून आलेला आहे, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट व्ोÀले.
‘मनसे'चे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा-भाईंदर शहर अध्यक्ष संदिप राणे यांनी या सभेचे आयोजन केले होते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती.
‘दुबे मुंबई मे आना...'
दरम्यान, भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषिकांना मारहाण करु, असे वक्तव्य केले होते. त्यावर कारवाई झाली का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. दुबे कुणाच्या तरी पाठिंब्याने अशा पध्दतीचे वक्तव्य केले. त्याला राज ठाकरे यांनी उत्तर दिले.
दुबे तुम्ही मुंबईमध्ये या, तुम्हाला मुंबईच्या समुद्रामध्ये बुडवून मारु, असे आव्हान राज ठाकरे यांनी यावेळी दिले. आम्ही कडवट हिंदू आहोत. पण, हिंदी नाही. हिंदीची सक्ती केली तर माझ्यासारखा कडवट मराठी सापडणार नाही, असा इशारा राज यांनी दिला. आम्ही गुलाम नाही. या प्रांतावर आमचा अधिकार आहे. मराठे अटकेपार पोहोचले होते, असा इतिहास आहे, असे ते म्हणाले.