पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती रायगड जिल्ह्यात प्रथम

पनवेल : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प २०२३-२४ या वर्षाच्या क्रमवारीत पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आली आहे.

राज्यात जागतिक बँक अर्थसहाय्यीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत ‘कृषी उत्पन्न बाजार समिती'ची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी २०२१- २२ पासून पणन संचालनालया मार्फत प्रसिध्द करण्यात येते. राज्यातील ३०५ बाजार समितीची २०२३-२४ या वर्षाची वार्षिक क्रमवारी महाराष्ट्र राज्य पणन संचलनालय द्वारे जाहीर करण्यात आली आहे. या गुणांकनात राज्यात ‘पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती'ने १११वा क्रमांक, कोकण विभागात सहावा क्रमांक तर रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या क्रमांकामुळे ‘पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती'चे संचालक आणि अधिकारी-कर्मचारी यांचे विविध स्तरातून अभिनंदन, कौतुक केले जात आहे.

दरम्यान, ‘पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती'ला पायाभूत सुविधांसह इतर सेवा सुविधा, आर्थिक निकष, वैधानिक कामकाज आणि इतर निकषांमध्ये वार्षिक क्रमवारीत चांगले गुण प्राप्त झाले आहेत. भविष्यात बाजार समित्यांसमोर मोठी स्पर्धा आणि आव्हाने उभे राहणार आहेत. आव्हाने आणि स्पर्धा लक्षात घेता ‘बाजार समिती'च्या कामकाजात आणखी काय सुधारणा करता येईल याबाबत संचालक मंडळ विचार करत आहे, अशी प्रतिक्रीया वार्षिक क्रमवारी रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर ‘पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती'चे सभापती नारायणशेठ घरत यांनी व्यक्त केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मार्गावर ‘एनएमएमटी ई' बस सुविधा