पनवेल मध्ये ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा' भवतीरसात संपन्न
पनवेल : गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तर्फे पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात आयोजित ‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा' मध्ये पुरुष गटात श्री. सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ तर महिला गटात शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
भजन स्पर्धेतील विजेत्या मंडळांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ'चे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक जयंत पगडे, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच आयोजन समिती सदस्य उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वष्राानिमित्त वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात २३ आणि २४ ऑगस्ट रोजी रंगलेल्या या भजन स्पर्धेत भजन मंडळांनी स्वतःची कला सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विजेत्या मंडळाला प्रत्येकी ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विजेत्या मंडळाला प्रत्येकी २५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाचे क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विजेत्या मंडळाला प्रत्येकी १५ हजार रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक ७ हजार रुपये तसेच उत्कृष्ट पखवाज वादक आणि उत्कृष्ट तबला वादक यांना प्रत्येकी ७ हजार रुपये तसेच सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पंडित शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील यांनी काम पाहिले. या भजन स्पर्धेच्या आयोजनामुळे भजन मंडळ आणि कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.
भजन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये पुरुष गटातून ३६ तर महिला गटातून ३० भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून अंतिम फेरीसाठी पुरुष आणि महिला गटातील प्रत्येकी १५ भजन मंडळांची निवड करण्यात आली होती.
‘रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा'चा निकाल
पुरुष गट : प्रथम क्रमांक - श्री. सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ - म्हसळा, द्वितीय क्रमांक - सुरताल भजन मंडळ - नारंगी, तृतीय क्रमांक - श्री. हनुमान प्रासादिक भजन मंडळ - खारघर, उत्तेजनार्थ - स्वरविहार भजन मंडळ - अलिबाग. उत्कृष्ट पखवाज वादक - कुणाल पाटील, उत्कृष्ट तबला वादक - भूषण गायकर (श्री. हनुमान प्रासादिक भजन मंडळ, खारघर).
महिला गट : प्रथम क्रमांक - शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ - कर्जत, द्वितीय क्रमांक - आई एकविरा महिला भजन मंडळ - दुंदरेपाडा, तृतीय क्रमांक - श्री. सदगुरु कृपा प्रासादिक महिला भजन मंडळ - चिंचवली, उत्तेजनार्थ - पारितोषिक श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ - नेरळ. उत्कृष्ट पखवाज वादक - ओमकार तराळे म्हणून कै. वैयजंती माता भजन मंडळ, सावळे-रसायनी), उत्कृष्ट तबला वादक - रोहन पाटील (आई एकविरा महिला भजन मंडळ, दुंदरेपाडा).