हरित शव दाहिनी चाचणी यशस्वी
अंबरनाथ : कमी इंधन,लाकडे, वेळ व धूर,ध्वनी व प्रदूषण मुक्त अंत्यसंस्कार होत असल्याने मृतांच्या नातेवाईकानी/ संबधितांनी या हरित शव दाहिनी चा वापर करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केले आहे. नवीन हरित शव दहिनीच्या चाचणीच्या प्रसंगी साळुंखे यांनी हे आवाहन केले .
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या सहकार्याने माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने १५ व्या वित्तायोग अनुदान योजनेतून ऊर्जा anthyesthi system कंपनी च्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व मधील शिवाजीनगर येथील हिंदू स्मशानभूमी मध्ये कमी लाकडे व वेळेत प्रदूषण व राख मुक्त अंत्यसंस्कार करण्यासाठी हरित शव दाहिनी/ ग्रीन सिमेंट्री उभी करण्यात आली होती, ती वापरण्यायोग्य होण्यासाठी शनिवारी दु १ वा शिवाजीनगर/कैलासनगर स्मशानभूमी अंबरनाथ पूर्व येथे पोलिसांनी दिलेल्या बेवारस शवाचे अंत्यसंस्कार, NCAP अंतर्गत खरेदी केलेल्या नवीन हरित शव दाहिनी/ग्रीन सिमेंट्री मध्ये प्रात्यक्षिक म्हणून करण्यात आले, यामध्ये शवाचे वजन अंदाजे ६० किलो होते यासाठी १३५ किलो लाकडे, ४ लिटर जळाऊ इंधन वापरण्यात आले.
शवदहन २.३० तासात पूर्ण झाले. दहन योग्य प्रकारे होऊन अस्थी ट्रॉली खालील ट्रे मध्ये योग्य प्रकारे जमा होत असल्याचे दिसून आले.
सदर प्रेताचे अंत्यसंस्कार प्रदूषण –धूर व ध्वनी मुक्त वातावरणात पार पडले, यासाठी सोलार स्क्रबर वापर करण्यात आला, यासाठी १५० ते २०० लिटर पाणी वापरण्यात आल्याने धूर/राख मुक्त अंत्यविधी योग्य प्रकारे पार पडल्याचे दिसले.
यावेळी माजी नगरसेवक सुभाष साळुंके,वाहतूक अधीक्षक उदय थोरात, स्वच्छता निरीक्षक खोजे, आरोग्य अधिकारी सुहास सावंत, ऊर्जाचे /शवदाहिनी पुरवठादार डॉ. सुदीप्ता आचार्य आणि स्मशानभूमी चालक (psl waste management) प्रतिनिधी रशीद भाई उपस्थित होते.