महापालिका मालमत्ता विभागात गैरमार्गाने मनमर्जी कारभार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मालमत्ता विभाग तर्फे महापालिकेच्या मालमत्ता सामाजिक आणि व्यावसायिक कारणासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना भाडेतत्वावर दिलेल्या आहेत. परंतु, मालमत्ता भाडेतत्वावर दिलेल्या संस्था, व्यक्तीची नोंद रजिस्टर मध्ये घेतली गेली नसल्याने महापालिका मालमत्ता विभागातील कायद्याचे उल्लंघन करणारे दोषी अधिकारी-कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आग्रोळी मधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर गोरखनाथ पाटील यांनी महापालिका आयुवतांकडे निवेदनाद्वारे केली आहे.      

महापालिका मालमत्ता विभाग तर्फे सामाजिक आणि व्यावसायिक कारणासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना भाडेतत्वावर दिलेल्या महापालिका मालमत्तांचे भाडेवसूली नोंदवहीमध्ये वेळोवेळी नोंदी घेण्यात आलेल्या नाहीत. भाडेवसूलीच्या नोंदवहीच्या पहिल्या पानावर भाडयाने दिलेल्या सर्व मालमत्ताची नोंद करणे, प्रत्येक पृष्ठावर स्वतंत्र मालमत्तेची नोंद घेणे आवश्यक असताना,सदर नोंदवहीत मालमत्तेची पहिल्या पानावर नोंद घेतलेली नाही. भाडेवसुलीच्या नोंदवहीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाडाखोड, उपरिलेखन, पेन्सीलने केलेल्या नोंदी, अपूर्ण नोंदी केलेल्या आहेत. मालमत्ता विभागाने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता या पाच वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकरारावर दिलेल्या आहेत. यामुळे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सदर मालमत्ता पुन्हा संबंधित संस्थेस पुन्हा भाडयाने दिली किंवा कसे?, याबाबतच्या नोंदी नोंदवहीमध्ये घेतलेल्या नाहीत. महापालिका तर्फे विविध संस्था, व्यक्ती यांनी महापालिकेस भाडे रवकम भरणा केल्याची नोंद भाडे नोंदवहीमध्ये करण्यात आलेली नाही. भाडेवसुलीच्या नोंदवही मध्ये प्रत्येक पृष्ठावर स्वतंत्र मालमत्तेची नोंद घेण्यात आलेली नाही. यामुळे महापालिकेकडे प्रत्यक्षात ताब्यात असलेल्या मालमत्तेची माहिती सदर नोंदवहीमध्ये दिसून येत नाही.  भाडेवसुलीच्या नोंदवहीमध्ये मोठ्या प्रमाणावर खाडाखोड, उपरिलेखन, पेन्सीलने केलेल्या नोंदी, अपूर्ण नोंदी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रत्यक्षात एखाद्या मालमत्तेची किती रक्कम थकीत आहे, याबाबतची माहिती मिळणे शक्य होत नाही. महापालिका मालमत्ता विभागाने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता या पाच वर्षाच्या कालावधीसाठी भाडेकरारावर दिलेल्या आहेत. यामुळे पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सदरच्या मालमत्ता पुन्हा संबंधित संस्थेस पुन्हा भाडयाने दिल्या किंवा कसे? याबाबतच्या नोंदी नोंदवहीमध्ये घेतलेल्या नाहीत, असे सुधीर पाटील यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.

सीबीडी सेक्टर-३ येथील सिडको समाजमंदिर महापालिकेने ‘रोटरी क्लब'ला २००७-०८ पासून पाच वर्षाकरिता भाडयाने दिले असताना सन २०१५४-१६ पर्यंत संबंधित संस्थेने रक्कम भरणा केल्याचे नस्तीवरून दिसून येते. कोपरखैरणे सेक्टर-१९ मधील महापालिका व्यायामशाळा जय संतोषी माता ग्राम क्रिडा मंडळ यांना ११ सप्टेंबर २००१ पासून भाडेतत्वावर दिली आहे. सदरची मुदत पाच वर्षासाठी असल्याचे नोंदवहीमध्ये नमूद आहे. परंतु, संबंधित संस्थेकडून २०१४-१५ पर्यतची रक्कम महापालिकेने स्विकारलेली आहे. भाडेकरार संपल्यानंतर देखील कोणाच्या आदेशानुसार आणि कोणत्या कायद्याअंतर्गत विविध संस्थांचे,व्यक्तीचे भाडेकरार सुरु ठेवण्यात आले होते, याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे, असेही सुधीर पाटील यांनी महापालिका आयुवत  डॉ. कैलास शिंदे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

नवी मुंबई महपालिका मालमत्ता विभागाने महापालिकेच्या मालमत्ता सामाजिक आणि व्यावसायिक कारणासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना भाडेतत्वावर दिलेल्या आहेत. परंतु, मालमत्ता भाडेतत्वावर दिलेल्या संस्था, व्यक्तीची नोंद रजिस्टर मध्ये घेतली नाही. या प्रकरणांची शहानिशा/चौकशी करुन मालमत्ता विभागात गैरमार्गाने स्वतःची मक्तेदारी चालवून महापालिकेस जमा होणारा महसूल स्वतःच्या खिशात घालणाऱ्या तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण महापालिका आयुवतांकडे केली आहे. या मागणीची महापालिका आयुवत दखल घेतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा, पुढील कायदेशीर लढाई लढण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही.- सुधीर पाटील, सामाजिक कार्यकर्ते - आग्रोळी, नवी मुंबई

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतूक नियमांचे उल्लंघन; २१४२ बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई