रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक संमेलन संपन्न

पनवेल : जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्था संचालित खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि सामाजिक संमेलन मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले.

सामाजिक संमेलनात स्कूल प्रांगणात ‘रंगीलो भारतः भारताच्या शाश्वत आत्म्याचा उत्सव' या आकर्षक संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यकमात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या सांस्कृतिक विविधतेचे आणि एकतेचे प्रभावी दर्शन घडवले.

‘जनार्दन भरत शिक्षण प्रसारक संस्था'चे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झलेल्या या सोहळ्याचे उद्‌घाटन पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या सोहळ्यामध्ये नर्सरीपासून बारावी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक नृत्य, लोकगीते, नाट्यछटा आणि संगीत यांच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांची संस्कृती रंगमंचावर साकारली. या समारंभात सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच शैक्षणिक, क्रीडा आणि सहशालेय उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३३ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना  प्रत्येकी १० हजार रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन मोठ्या सन्मानाने गौरविण्यात आले.

याप्रसंगी ‘जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था'चे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, शकुंतला ठाकूर, ‘संस्था'चे सदस्य परेश ठाकूर, संचालिका अर्चना ठाकूर,  सचिव डॉ. एस. टी. गडदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुरवे, खारघर शहर भाजपा अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, निलेश बाविस्कर, आरती नवघरे, नेत्रा पाटील, मुख्याध्यापिका राज अलोनी, कीर्ती नवघरे, किरण पाटील, दीपक शिंदे, स्वप्नील ठाकूर, अमोघ ठाकूर, अमर उपाध्याय, नितेश पाटील, प्रवीण बेरा, यांच्यासह पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जे जे रसोई हॉटेल समोरील अनधिकृत शेड जमीनदोस्त