रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात रस्त्यावर आणि पदपथावर असलेले अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करुन त्याची विक्री करणारे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आठही महापालिका विभाग कार्यालयांतर्फे १२ आणि १३ जून या दोन्ही दिवशी धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत आठही महापालिका विभागांच्या क्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या एकूण १९० विक्रेत्यांवर तसेच १५६ खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कार्यवाही करुन १५६ गॅस सिलेंडर, ६७ शेगड्या आणि खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य, १९ हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून, जप्त हातगाड्या डंपिंग यार्ड मध्ये जमा करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर खाद्यपदार्थ विक्रीमुळे होऊ शकणाऱ्या अनेक आजारांना आळा घालण्याच्या दृष्टीने तथा अपघात टाळण्याच्या दृष्टीने सर्वच महापालिका विभाग सहाय्यक आयुवतांना दक्ष राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले असून, त्यानुसार सर्व महापालिका विभाग कार्यालय तर्फे रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर निरंतर कारवाई तसेच जप्ती, गुन्हे दाखल करणार आहेत, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली मध्ये सफाई कामगारांच्या नोंदीत हेराफेरी?