नाल्यावरील पुल कोसळून नागरिकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद

उल्हासनगर : १४ जून रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर कॅम्प-५ मधील ३९ सेक्शन गणेशनगर भागातील लोक वस्तीमध्ये असलेला पादचारी फुल कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र, अद्यापपर्यंत महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळी जाऊन पाहणी न केल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी कोसळलेल्या पुलावरच बसून महापालिकेचे लक्ष वेधण्याकरिता प्रतिकात्मक रडण्याचे आंदोलन केले. दरम्यान, सदर दुर्घटनेमुळे त्या परिसरातील जवळपास ५०० हून अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे .

उल्हासनगर कॅम्प नंबर-५, ३९ सेक्शन गणेशनगर भागात नाल्यावर असलेल्या सदर पुलाची दुरावस्था झाली होती. स्थानिकांनी अनेक आंदोलन मागण्या करुन नवा पुल बांधण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर १४ जून रोजी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे सदर पुल कोसळला. त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. काही नागरिकांनी तर या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी बसून प्रतिकात्मक रडण्याचे आंदोलन केले. दरम्यान, सदर पुल कोसळल्याने आमची गैरसोय झाली असून प्रशासनाने लवकरात लवकर नवा पूल बांधावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे .

सदर पूल २० वर्षे पूर्वीचा जुना आणि धोकादायक असून गेल्या २ वर्षापासून तो नव्याने पालिकेने बनवावा यासाठी आम्ही लढतोय. नगरपालिकेला जाग येत नाही. त्यामुळे आम्ही या पुलाजवळ श्राध्द घाला आंदोलन देखील केले होते. हिललाईन पोलीस ठाण्याच्या परिसरातून या नाल्याला पाणी येते. मुसळधार पावसात नाला पाण्याने तुडुंब भरून वाहत असतो आणि अशा अवस्थेमध्ये १४ जून रोजी रात्री या पुलाची दुर्घटना घडली. ज्यावेळी सदर पुल कोसळला, त्यावेळी एक महिला लहान मुलासह जात होती; पण ती थोडक्यात बचावली. पूल कोसळण्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून एवढी मोठी दुर्घटना घडूनही महापालिकेचा एकही अधिकारी तेथे फिरकला नाही, अशी खंत समाजसेवक राधाकृष्णन साठे यांनी व्यवत केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पिसवली ग्रामस्थांची लवकरच डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता