६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन

ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले जाणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव, फिरती विसर्जन व्यवस्था यात वाढ केलेली आहे. तसेच या संपूर्ण व्यवस्थेची माहिती देण्यासाठी हरित विसर्जन ॲप तयार करण्यात आले असून नागरिकांनी त्यावर नोंदणी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

हरित विसर्जन ॲप...
हरित विसर्जन ॲपमुळे नागरिकांना त्यांच्या नजीक परिसरात कुठे विसर्जन व्यवस्था आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच ‘ठामपा'ने फिरत्या विसर्जन व्यवस्थेबाबत तयार केलेले मार्गही दिले जाणार आहे. https://ecovisrjan.com/  अशी ॲपची लिंक असून सोबत वयूआर देखील आहे.

शाडू माती कार्यशाळेस प्रतिसाद...
ठाणे महापालिका तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मूर्ती कार्यशाळांमध्ये १३८५ विद्यार्थी आणि ३५० नागरिकांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवल्या. तसेच नागरिकांनी महापालिका केंद्रांमधून माती नेऊन २५ ठिकाणी खाजगी कार्यशाळांचेही आयोजन केले. महापालिका तर्फे मूर्तीकारांना २५ टन माती विनामूल्य देण्यात आली. त्याच लाभ १७ मूर्तीकारांनी घेतला.

प्रभाग समितीनिहाय विसर्जन व्यवस्थाः
नौपाडा-कोपरी -कृत्रिम तलाव २, हौद (टाकी) ७, मूर्ती स्वीकृती केंद्रे ३, खाडी घाट १, फिरते विसर्जन १.
उथळसर -कृत्रिम तलाव २, हौद (टाकी) ७, मूर्ती स्वीकृती केंद्रे १, फिरते विसर्जन १.
कळवा -कृत्रिम तलाव ५, हौद (टाकी) ८, खाडी घाट २, फिरते विसर्जन २.
दिवा -कृत्रिम तलाव ३, हौद (टाकी) ९, खाडी घाट १, फिरते विसर्जन २.
मुंब्रा -कृत्रिम तलाव १, हौद (टाकी) ५, खाडी घाट ३, फिरते विसर्जन १.
माजिवडा-मानपाडा -कृत्रिम तलाव ८, हौद (टाकी) १०, खाडी घाट ३, फिरते विसर्जन २, मूर्ती स्वीकृती केंद्र २.
लोकमान्य नगर-सावरकर नगर -हौद (टाकी) ७, फिरते विसर्जन २, मूर्ती स्वीकृती केंद्र १.
वागळे प्रभाग -कृत्रिम तलाव २, हौद (टाकी) १०, फिरते विसर्जन २, मूर्ती स्वीकृती केंद्र २.
वर्तकनगर -कृत्रिम तलाव १, हौद (टाकी) ९, फिरते विसर्जन २, मूर्ती स्वीकृती केंद्र १. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे परिसरात सामासिक जागेचा व्यवसायासाठी वापर