नाट्यगृहात उप-मुख्यमंत्र्यांचे शिल्प-प्रतिकृती स्थापित करण्याची मागणी

अंबरनाथ : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गौरवासाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या नाट्यगृहात त्यांचे भव्य शिल्प, प्रतिकृती, म्यूरल किंवा भव्य चित्र स्थापित करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना या संदर्भात पत्र दिले आहे.

चौधरी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, राज्याचे संवेदनशील आणि जनसामान्यांच्या कल्याणासाठी कटीबध्द असलेले नेते, साहित्यप्रेमी, नाट्यप्रेमी एकनाथ शिंदे यांचे कार्य आणि नेतृत्व नाट्यप्रेमी तसेच युवकांना प्रेरणादायी ठरेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

ना. एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव म्हणून, अंबरनाथ नगरपालिकेच्या नाट्यगृहात त्यांचे भव्य शिल्प किंवा प्रतिकृतीची स्थापना करावी, अशी चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे अंबरनाथच्या सांस्कृतिक केंद्रात उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा आणि कार्याचा आदर्श कायमस्वरुपी जतन केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली