कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे परिवहन व्यवस्थापकांना साकडे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवरील करार पद्धतीवर (ठोक मानधन) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या,चालक/वाहकांच्या तसेच परिवहन विभागातील अन्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्यांबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक आजारी असल्याने त्यांच्या जागी तुषार दौंडकर यांच्याकडे सध्या कार्यभार आहे,आचलकर उपकार्यकारी अभियंता,दीपीका पाटील परिवहन प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेत त्यांना समस्या सोडविण्यासाठी लेखी निवेदन सादर करत समस्यानिवारणासाठी साकडे घातले.
महापालिका परिवहन विभागामध्ये चालक, वाहन व अन्य बहूसंख्य कर्मचारी हे गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ ठोक मानधना वर काम करत आहेत. तसेच कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत व त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही या समस्यांचे व असुविधांचे आजतागायत निवारण झालेले आहे. त्याविषयी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी परिवहन व्यवस्थापकांना जवळपास १६ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर करत केले.
अशा विविध समस्यांचा आढावा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी घेतला . यावेळी त्यांच्यासमवेत शिष्टमंडळामध्ये युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड. उपाद्यक्ष कांतीलाल चांदणे,नरेश मागाडे .हरी गायकवाड. रवी सोमवंशी ,शंकर सावंत, अमित जाधव, रतन वैद्य ,भालचंद्र कोळी, युनिट अध्यक्ष जितेश तांडेल,अशोक मिसाळ, राजेंद्र जाधव, संग्राम इंगळे सहभागी झाले होते.