‘वसुंधरेचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी'

नवी मुंबई : वसुंधरा अर्थात पृथ्वीच्या संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. प्लास्टिक थर्माकोल ई कचरा याचा कमीत कमी वापर करून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं अन्यथा वेगवेगळ्या दुष्परिणामांना आपण आमंत्रण देऊ व हे आपल्यासाठी खूप घातक असेल, म्हणून सर्वांनीच वसुंधरेला जास्तीत जास्त झाडे लावून पाण्याची बचत विजेची बचत करून तिचं समर्थन करावे असे मत प्रा अमोल वाघमारे यांनी व्यवत केले. नवी मुंबई मनपा संचलित माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक १०३, ऐरोली येथे पर्यावरण संवर्धन याविषयी व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. ललिता वाणी होत्या.

कार्यक्रमास विजय महाजन, कुठे सर, भास्कर मॅडम, कडू मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक क्रीडा शिक्षक प्रदीप मस्तूद यांनी केले. कार्यक्रमाचे सुरुवात झाडाला पाणी घालून करण्यात आली. ”हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळते आहे,  ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे, ”हे सुंदर असं पर्यावरण जागृतीचे गीत व त्याचा संपूर्ण अर्थ यावेळी स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सांगितला. त्याचबरोबर पुस्तक दिनही असल्याने वाचाल तरच वाचाल हे पुस्तकाचे महत्व त्यांनी आपल्या मनोगतामधून विशद केलं शिक्षण किती महत्त्वाचा आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. मुख्याध्यापिका सौ. ललिता वाणी यांनीही पर्यावरणाचे रक्षण हे काळाची गरज आहे व आपण सर्वांनी मिळून त्याची निगा राखली पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे बहारदार असं सूत्रसंचालन प्रदीप मस्तूद यांनी केलं.  प्राची म्हात्रे यांनी मानले कार्यक्रमात शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोपरा गावातील अनधिकृत आठवडा बाजार बंद