दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
कीर्तनातून विमानतळ नामकरणाचा गजर
वाशी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषण झाली नाही.त्यामुळे विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्यासाठी काटई गाव ग्रामस्थांनी कीर्तनातून गजर करण्यास सुरुवात केली आहे.
प्रकाशाचा आणि आनंदाचा सण म्हणून दिवाळी सणाकडे पाहिले जाते.त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जर दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर केले असते तर येथील भूमिपुत्र दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी करणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर केले नाही. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीची तड लावण्यासाठी समस्त भूमिपुत्र येत्या ३ डिसेंबर रोजी भव्य जनआंदोलन करणार आहेत.त्यासाठी येथील संघटना बैठका घेत आहेत. त्यातच आता विमानतळ नामकरणसाठी कीर्तनातून देखील गजर केला जात आहे. कल्याण तालुक्यातील काटई या गावात मागील ५२ वर्षांपासून कीर्तन सेवा सप्ताह सुरु आहे. या सप्ताहात किर्तन श्रवणाकरिता ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील संत सज्जन, भाविक येत असतात. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाकरिता यंदा काटई ग्रामस्थ कीर्तन सप्ताहामध्ये सहा दिवस ‘दिबा जागर' करुन ‘दिबां'च्या नावाकरिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.