भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद- ना. गणेश नाईक 

नवी मुंबई : पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीयांचे प्राण घेतले. यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून शौर्याने  पाकिस्तानला  धडा शिकवला. भारतीय सैन्याचा पराक्रम  संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन नामदार गणेश नाईक यांनी केले.

सामर्थ्यवान भारतीय सैन्याचे कौतुक करण्यासाठी नवी मुंबईमध्ये  तिरंगा रॅलीचे आयोजन नामदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते. 

दहशतवाद्यांनी  माता-भगिनींचे कुंकू पुसले आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांच्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले. पाकिस्तान विरोधात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय एकता आणि तिरंगा ध्वजाचा  सन्मान वाढवण्याच्या दृष्टिकोनाने ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.

वाशी सेक्टर 28 येथील ब्लू डायमंड हॉटेल येथून तिरंगा रॅलीचा शुभारंभ झाला. राष्ट्र प्रेमाने ओसंडून वाहणाऱ्या या तिरंगा रॅलीमध्ये माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

तिरंगा रॅली दरम्यान भारत मातेचा जयजयकार करण्यात आला.  रॅली दरम्यान संपूर्ण परिसर देशाच्या अभिमानाचे प्रतीक तिरंगा ध्वजाने फुलून गेला होता.

पाकिस्तानने केलेल्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व भारतीयांना विश्वास होता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य या हल्ल्याला चौख प्रत्युत्तर देणार त्याचप्रमाणे भारतीय सैन्याच्या तिन्ही सैन्य दलांनी  संयुक्तरीत्या कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे तसेच हवाई पट्टी उध्वस्त केली.  भारतीय सेना किती सजग आणि सामर्थ्यवान आहे. हे सर्व जगाने पाहिले. देशातील सर्व जनता भारतीय सैन्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. भारतीय सैन्याचे मनोबल आणखी वाढले.  आज संपूर्ण जग सामर्थ्यवान भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत असल्याचे नामदार  गणेश नाईक यांनी सांगितले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा रॅलीची यशस्वी सांगता झाली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अनधिकृत घरांना दिलेल्या नोटिसा मागे घ्या... ना. गणेश नाईक यांचे सिडकोला निर्देश