महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही... मनसेचा शाळांना इशारा

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच काढलेल्या शासन निर्णया नुसार सर्व शाळांनी त्रिभाषा सूत्र राबवायचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारण पणे हिंदी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या या धोरणाला सन्मा. राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रातील शाळा पहिली पासून हिंदी कशा शिकवतात हे आम्ही बघतो, असा इशारा राजसाहेब ठाकरे यांनी दिला आहे. तसेच सर्व शाळांनी या शासन निर्णयाला विरोध करावा असेही म्हटले आहे. त्यासाठी राज ठाकरे यांचे पत्र महाराष्ट्रातील सर्व शाळांना देण्यात येणार आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून मनसे प्रवक्ते, मनसे विद्यार्थी सेना सरचिटणीस व मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आज वाशी मधील शाळांना राजसाहेब ठाकरे यांचे पत्र देण्यात आले.

वाशी मधील फादर एग्नल, सेंट मेरी, सेक्रेड हार्ट, सेंट लौरेन्स या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून पत्र देण्यात आले. तसेच त्यांना विनंती करण्यात आली की, त्यांनी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून पहिली पासून शिकवू नये. तसेच राज्य सरकारच्या हिंदी सक्तीला विरोध करावा. यावेळी अचानकपणे असे हिंदी आम्हाला पहिली पासून शिकवता येणार नसल्याचे काही शाळेतील मुख्याध्यापकांनी मनसे शिष्ट मंडळाला सांगितले. तसेच पहिलीला तीन भाषा शिकवल्याने विद्यार्थ्यांवर ताण पडेल असेही मान्य केले. त्यामुळे राज्य सरकार ने शाळा व्यवस्थापन, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण तज्ञ् अशा कोणाकडून ही अभिप्राय न घेता हिंदी भाषा लादण्याचे धोरण का अवलंबले, असा प्रश्न उपस्थित होतो. लवकरच मनसे सर्व शाळांना राज ठाकरेंचे हे पत्र देईल, असे गजानन काळे यांनी सांगितले. मनसेच्या या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्या सोबत मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना अनिकेत पाटील, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतिक खेडकर, महिला सेना उप शहर अध्यक्ष दीपाली ढऊळ, अनिथा नायडू, सोनिया धानके, शहर सचिव यशोदा खेडसकर, मनसे विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते, शाम ढमाले, चंद्रकांत मंजुळकर, अक्षय भोसले, अमोल आयवळे, नितीन नाईक, रोहन पाटील, मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका रुग्णालयात स्टंटबाजी करणे मनसैनिकांच्या अंगलट