३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम २ वर्षापासून रखडले
उरण : नवी मुंबई शहर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या गव्हाण फाटाजवळील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून गेल्या २ वर्षापासून सदर काम रखडले आहे. या पुलामुळे वाहतुकीचा गुंता दिवसेंदिवस वाढत असून रेल्वे प्रशासन आणि संबंधित प्रशासन यांच्या दुर्लक्षितपणामुळे, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वळसा घालून ये-जा करणाऱ्या प्रवाशी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वे क्रॉसिंग पुलाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
नवी मुंबई शहर, पनवेल शहरांना जोडणारा गव्हाण फाट्यावरील रेल्वे क्रॉसिंग महत्त्वाचा पुल मार्ग रस्ता असून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर चिरनेर पूर्व विभागातील विद्यार्थी, चाकरमानी, प्रवाशी नागरिक करीत आहेत. परंतु, ‘रेल्वे'च्या विस्तारीकरणामुळे गव्हाण फाट्यावरील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे जुने काम ऑक्टोबर २०२३ मध्ये तोडून रेल्वे प्रशासनाच्या देखरेखीखाली टाटा प्रोजेक्ट लि. कंपनीने नव्या रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम हाती घेतले. मात्र, या पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य प्रवाशी नागरिकांना सहन करावा लागत आहे.
गव्हाण फाटाजवळील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असून गेल्या २ वर्षापासून सदर काम रखडले आहे. या पुलामुळे वाहतुकीचा गुंता दिवसेंदिवस वाढत असून रेल्वे प्रशासन आणि संबंधित प्रशासन यांच्या दुर्लक्षितपणामुळे, अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वळसा घालून ये-जा करणाऱ्या प्रवाशी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वर्दळ येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वे क्रॉसिंग पुलाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.