मराठी माणसाच्या रेट्यापुढे आमदाराने पोलिसांच्या साक्षीने हटवली गुजराती पाटी 

नवी मुंबई : गुजरात मधील भाजप आमदार वीरेंद्र जडेजा यांनी सीवूड्स नवी मुंबई मधील भाजप जनसंपर्क कार्यालयाची पाटी २० जुलै रोजी पुन्हा गुजराती मध्ये लावली. भाजप आमदार आणि त्याच्या सीवूड्स मधील कार्यकर्त्यांनी मराठी माणसाला डिवचण्यासाठी मुद्दाम गुजराती मध्ये पाटी लावली आणि मराठी भाषा, मराठी माणसाचा अपमान केला असा आरोप करीत संतापलेल्या मराठी जणांनी मनसे शहर सचिव सचिन कदम, मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे सीवूड्स विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, शिवसेना(उबाठा) विभाग प्रमुख विशाल विचारे, काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष रत्नाकर कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेस(शप गट) भटक्या विमुक्त जाती जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एनआरआय सागरी पोलीस ठाणेवर मोर्चा नेला.

यावेळी सर्व मराठी जणांनी मराठीचा अपमान करणारा भाजप आमदार, कार्यकर्ता यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. गुजराती पाटी हटवून मराठी पाटी लावण्याची आक्रमक भूमिका मांडण्यात आली. या शिष्टमंडळात मनसे शहर सचिव सचिन कदम, मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, मनसे सीवूड्स विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, शिवसेना(उबाठा) विभाग प्रमुख विशाल विचारे, काँग्रेस अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष रत्नाकर कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेस(शप गट) भटक्या विमुक्त जाती जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण, मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, अक्षय भोसले, उमेश गायकवाड, मनसे महिला सेना उप शहर अध्यक्ष अनिथा नायडू, मनसे विभाग सचिव अप्पासाहेब जाधव, उप विभाग अध्यक्ष संतोष टेकवडे, प्रशांत कोळी, शिवसेना शाखाप्रमुख ओमकार हरियाण, मनसे शाखाअध्यक्ष संदीप कांबळे, प्रकाश कोकाटे, शिवसेना उपशाखाप्रमुख तुषार रसाळ, मनविसे विभाग सचिव शंकर घोंगडे-पाटील, सोमनाथ चव्हाण हे उपस्थित होते. सर्वांच्या आक्रमक भूमिकेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कदम यांनी वादग्रस्त गुजराती पाटी तात्काळ हटवण्याचे आश्वासन दिले. 

त्यानंतर मनसे पदाधिकारी यांनी भाजप जनसंपर्क कार्यालयाकडे मोर्चा वळवला. पोलिसांच्या साक्षीने वादग्रस्त गुजराती पाटी हटवण्यात आली. तसेच भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याने तमाम मराठी जणांची जाहीर माफी मागितली. तसेच काही तासात मराठी पाटी बसवण्याचे आश्वासन दिले. 

जर गुजराती पाटी पुन्हा या आमदाराने बसवली तर मनसे यापुढे मनसे स्टाईल धडा शिकवेल, असा इशारा मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी दिला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर - राज्यपाल