पलावा पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे

कल्याण : पलावा पुलामुळे राजकारण चांगलेच तापले असून मनसे नेते, माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करताना पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. भितीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केले. सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाहीत, ते खाल्ल्या मिठाला जागत आहेत.पलावा पुलावर लोकांचे बळी जातील, त्यामुळे पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती करुन मगच पुल सुरु करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

घाईघाईत पलावा फुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मोटरसायकलचा अपघात झाला. पुल पुन्हा बंद केला, ग्रीट पावडर टाकून पुल पुन्हा सुरु केला आहे. मात्र, पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सत्ताधारी ठेकेदाराला काही बोलत नाही, कारण ते खाल्ल्या मिठाला जागत आहेत. १५० कोटींचा पुल ७००-८०० कोटी पर्यंत पैसे खाण्यासाठी नेला. पुल चालू करताना आमच्यावर टीका केली. त्यांनी काहीही करायचे ते सहन करण्यात आले. मी सहन करणार नाही. त्यांचे मित्र पक्ष सहन करत असतील; मनसे सहन करणार नाही. या पुलाचे साधे गार्डन लॉन्च केले तेव्हा फटाके वाजवले. मात्र, या पुलाचे लोकार्पण करताना त्यांना भिती होती. या पुलावर लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर पुलाची देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

पलावा पुलाबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा लाचलुचपत विभागाकडे तक्रार करा. पोलीस फार फार तर ठेकेदाराला नोटीस देतील; मात्र त्याला काही अर्थ नाही. अत्यंत मोठ्या प्रमाणात एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे. ठेकेदाराचे आणि त्याच्या इतर सेल कंपन्यांची चौकशी करण्यात यावी. तेव्हा इथले काळे लबोर बाहेर येईल.
- राजू पाटील, माजी आमदार तथा नेते, मनसे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली