मनविसे पदाधिकारी-कार्यकर्ते भाजप मध्ये दाखल

पनवेल : पनवेल महानगरातील ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष अविनाश कोळी, युवा नेते परेश ठाकूर, युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी स्वागत केले.

याप्रसंगी माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगरसेविका प्रिती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, सारिका भगत, पनवेल मंडल भाजपा अध्यक्ष सुमित झुंजारराव, सरचिटणीस अमित ओझे, केदार भगत, रुपेश नागवेकर, महिला मोर्चा अध्यक्षा रुचिता लोंढे-समेळ, ‘भारतीय जनता युवा मोर्चा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पक्षप्रवेश कार्यक्रमात ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिमेष अमित ओझे, पनवेल शहर अध्यक्ष केदार रेवाळे, प्रभाग-१७ अध्यक्ष ऋषिकेश सावंत, पनवेल तालुका सचिव आकाश गाडे, प्रभाग-१९ अध्यक्ष अभि रिंगे, आकाश दलाल, हिमांशु पाटील, पराग भातणकर, प्रणय मोहिते, तन्मय मोरे, सौरभ रामधरणे, रुद्र पाटील, प्रभंजन गाडगीळ, प्रथम दासरी, प्रथम ठाकरे, प्रसाद धवळे, मृण्मय पाटील, शिवराज बोबडे हर्षद घाटे, आशुतोष पाटील, रोहित धामणस्कर, हर्ष जेटवा यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची, यंत्रणा सतर्क -ना. एकनाथ शिंदे