‘शहर जिल्हा काँग्रेस कमिटी'ची प्रांताध्यक्ष सपकाळ यांच्याकडे बैठक
उल्हासनगर : ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी'चे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, दादर येथे उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, ‘नांदेड'चे खासदार रवींद्र चव्हाण तथा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत उल्हासनगर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडून आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलताना म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तळागाळापासून कामाला सुरुवात करावी. उल्हासनगर म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे. उल्हासनगर शहरातील नागरिक तेथील सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले आहेत. अशा स्थितीत ‘काँग्रेस'ने आपली ठळकपणे भूमिका निभावावी आणि जनतेच्या सोबत उभे रहावे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी आगामी महापालिका निवडणुकीत निर्णायक सदस्य निवडून आणण्यासंदर्भातील रणनीती प्रांत अध्यक्ष सपकाळ यांच्यासमोर मांडली.
सदर बैठकीला ‘काँग्रेस'च्या माजी नगरसेविका अंजली साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा, सुनील बहराणी, मनीषा महाकाळे, प्रा. सिंधु रामटेके, जिल्हा उपाध्यक्ष श्याम मढवी, महादेव शेलार, राजेश फक्के, कुलदीप आयलशिंगानी, जिल्हा महासचिव दिपक सोनोने, फमिदा सय्यद, युवराज पगारे, डॉ. धीरज पटोले, डॉ. हितेश सचवानी, वामदेव भोयर, चिराग फक्के, आबासाहेब साठे, निलेश जाधव, अनिल यादव, ईश्वर जग्याशी, पवन मीराणी, उषा गिरी, विद्या शर्मा, समाधान खरे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सदर बैठकी नंतर ‘उल्हासनगर काँग्रेस'च्या शिष्टमंडळाने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना उल्हासनगर शहरातील २०२२ पूर्वीची सर्व बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील प्रश्न येत्या अधिवेशनात ‘काँग्रेस'च्या आमदारांमार्फत घेण्याचे निवेदन दिले.