महापालिका आवारात अवैधपणे पार्किंग
भिवंडी : भिवंडी महापालिका मुख्यालय आवारातील अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांवर महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून नोटिसा लावून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
भिवंडी महापालिका मुख्यालय आवारात अनेक चारचाकी खाजगी वाहने अनधिकृतपणे पार्किंगमध्ये उभी करण्यात आली आहेत. या सर्व वाहनांना महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून नोटिसा लावून त्याद्वारे ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. वाहन विभागाकडून सदर वाहने हटवण्यात येणार असून त्यानंतर दंडात्मक कारवाईसह वाहन मालकांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका आवारात अवैधपणे पार्किंग करणाऱ्या वाहन मालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.