दुबई येथे रंगला आषाढी एकादशी सोहळा
कल्याण : सालाबाद प्रमाणे श्री गणेश भजन मंडळ शारजाह यांनी यावर्षी देखील आषाढी एकादशी सोहळा दुबई मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मंडळाचे यंदा दहावे वर्ष होते. मराठी लोकांना एकत्र आणण्याचे आणि आपली मराठी परंपरा जोपासण्याचे मुख्य कार्य मंडळ वर्षानुवर्षे करीत आहे. दुबईतील मराठी माणसांनी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
मंडळाचे चालक विठोबा अहिरे आणि मंडळाचे सर्व धडाडीच्या कार्यकर्त्यांमुळे शांततेत आणि मंगलमय वातावरणात सदर सोहळा यशस्वीरित्या साजरा झाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक म्हणजे दिंडी, नऊवारी साड्यांमध्ये महिला आणि वारकरी पोशाखात मंडळातील लोकांनी अक्षरशः पंढरपूरची दिंडी नाचवली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरीचे स्मरण-पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुबईच्या वाळवंटात अक्षरशः पंढरपूर सारखी वारी रंगली. मान्यवरांचे सत्कार, ज्ञानेश्वरीचे वाटप आणि देवतांच्या आरत्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.