४ वर्षीय मुलाचे स्कुल बस चालकाकडून लैंगिक शोषण
नवी मुंबई : सीवुडस् येथील दिल्ली पब्लिक स्कुल मध्ये स्कुल बस चालकाने ४ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते वि्ल मोरे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी-शिवसैनिक २५ एप्रिल रोजी शाळा प्रशासनाला जाब विचारण्याकरिता गेले असता शालेय व्यवस्थापनाने गेट उघडण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आणि शाळेमध्ये घुसून घडल्या प्रकारात हलगर्जीपणा केला म्हणून मुख्याध्यापकांविरोधात आणि शाळा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाला मुख्याध्यापकांना सदर प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुमित्र कडू, संतोष घोसाळकर, मनोज इसवे, संदीप पाटील, शहर प्रमुख महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख समीर बागवान, संदीप पवार, शिवाजीराव शिंदे, विभागप्रमुख विशाल विचारे, मिलिंद भोईर, तानाजी जाधव, हरीश इंगवले शाखाप्रमुख राकेश माहुलकर, अरविंद जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते.
‘मनसेे'चा मुख्याध्यापकांना घेराव
मनसे पदाधिकाऱ्यांनी डीपीएस शाळेचे मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांना घातला घेराव. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करुन मनसे कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ‘मनसेे'च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना सहआरोपी करावे, अशी मागणी यावेळी पोलिसांकडे केली.
मुख्याध्यापकांचे मुजोर वर्तन. ४ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असतानाही २४ एप्रिल रोजी संबंधित पालक मुख्याध्यापक वशिष्ठ यांना भेटले असताना सुध्दा मुख्याध्यापकांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे नाईलाजास्तव पालकांना पोलिसांमध्ये जाऊन तक्रार द्यावी लागली. त्याच्या निषेधार्थ ‘मनसे'च्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी डीपीएस शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक यांच्या विरुध्द घोषणा देवून त्यांचा निषेध केला. दिल्ली पब्लिक शाळेत अशा घटना वारंवार होत असल्याने मुख्याध्यापक यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई करण्याची ‘मनसे'तर्फे मागणी करण्यात आली आहे.
‘मनसे'तर्फे सदर आंदोलन शहर सचिव सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात मनसे विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतिक खेडकर, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, मनविसे शहर सचिव विपुल पाटील, मनविसे विभाग अध्यक्ष मधुर कोळी, मनसे शाखा अध्यक्ष संदीप कांबळे, आदि उपस्थित होते.