महेंद्र घरत यांच्यातर्फे मुरबा गणेशभक्तांसाठी पॅसेंजर बोट

उलवे : राष्ट्रीय कामगार नेते तथा ‘काँग्रेस'चे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र  घरत आणि शुभांगी घरत दाम्पत्य गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची गणपतीवर नितांत श्रध्दा आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला महेंद्र घरत यांच्यातर्फे मुरबा गणेशभक्तांसाठी पॅसेंजर बोटीचे जलावतरण शुभांगी घरत यांच्या हस्ते करण्यात आले.

मध्यंतरी मुरबा गणपतीला दर्शनासाठी जाताना होडी कलंडली होती. साहजिकच भक्तांमध्ये भिती होती. सदर भिती दूर करण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी पॅसेंजर बोटींची इच्छा बोलून दाखवली आणि त्यानुसार त्यांनी हजारो गणेशभक्तांचे स्वप्न पूर्ण केले. येथील गणेश भक्तांसाठी साधारण ६ लाख रुपयांची पॅसेंजर बोट आणि ८० लाईफ जॅकेट भेट दिले आहेत.यापूर्वी भवतांना बसण्यासाठी बाकडेही दिलेले आहेत.

यावेळी ‘मुरबा गणपती व्यवस्थापन कमिटी'च्या वतीने महेंद्र आणि शुभांगी घरत यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महेंद्र घरत यांचे भाऊ गुलाब घरत, रमेश घरत, अनंता घरत, किसन घरत तसेच घरत परिवारातील महिला भगिनी, उत्तम कोळी, सुभाष पाटील, यशवंत ओवळेकर, वैभव पाटील, किरीट पाटील, विनोद म्हात्रे, मुरलीधर ठाकूर, लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, विवेक म्हात्रे, आदित्य घरत, किरण कुंभार, अरुण म्हात्रे, अंगद ठाकूर, राजेश ठाकूर आणि मोठ्या संख्येने  ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण पूर्व विभागात वीज पुरवठा वारंवार खंडीत