जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत - लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : ‘पनवेल'चे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रितम म्हात्रे आदी पिता-पुत्र समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून, त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
पनवेल शहरातील विश्राळी नाका येथील गुरुशरणम सोसायटी मध्ये भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले असून, या कार्यालयाचे उदघाटन २२ मे रोजी केल्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे नेहमीच समाजकारण करत असून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल, असा ठाम विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यवत केला.
या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश भाजपा सदस्य बाळासाहेब पाटील, अतुल पाटील, उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी, युवा नेते परेश ठाकूर, ॲड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक गणेश कडू, बबन मुकादम, पनवेल मंडल भाजपाध्यक्ष सुमित झुंझारराव, कर्नाळा मंडल भाजपाध्यक्ष मंगेश वाकडीकर, जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर आंग्रे, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, पुष्पलता मढवी, सीमा घरत, सरस्वती काथारा, लीना पाटील, रमाकांत म्हात्रे, गौरव कांडपिले यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः असे भाजपचे तत्व आहे. भाजपा मध्ये काम करेल त्याला संधी नवकी मिळते. प्रितम म्हात्रे धडाडीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला पुढे मोठी संधी आहे. शेकाप विरुध्द भाजप म्हणून आमचे मतभेद झाले. पण, जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे राजकारण विरहित काम करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत कधीही दुजाभाव झाला नाही, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले.
खुर्ची कामा करता असते मानाकरिता नाही. जनसंपर्क कार्यालयात मुख्य खुर्ची प्रितम म्हात्रे यांची असणार आहे. मात्र, ते खुर्चीत न बसता उभे आहेत. काम करणाऱ्याला खुर्चीची गरज नसते, अशा शब्दात यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रितम म्हात्रे यांचे कौतुक केले. जो काम करेल तो पुढे जाईल. त्यामुळे आपले कुटुंब सांभाळत पक्षाचे आणि प्रामुख्याने देशहिताचे सर्वानी काम करावे, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले.
जनसेवा करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. खालापूर, पनवेल, उरण परिसरासह रायगड मधून कुठूनही नागरिक आले तरी त्यांना जनसंपर्क कार्यालयात सन्मानाने वागणूक मिळेल. कोणाची अडकलेले कामे असतील तर ती नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जाईल, अशी ग्वाही देतानाच, पक्षाचे कार्य अधिक जोमाने करण्याचा मानस यावेळी प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात ‘शेकाप'चे खांदा कॉलनी अध्यक्ष जयंत भगत, कामोठे शहर प्रमुख संघटक अल्पेश माने, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, खांदा कॉलनी महिला अध्यक्ष निर्मला गुंडरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शेकाप मधून भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे कामोठे आणि खांदा कॉलनी मध्ये प्रितम म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर ‘भारतीय जनता पार्टी'ची ताकद वाढली आहे.