एक दिवसीय चित्र प्रदर्शनात ५० चित्रांचा सहभाग

नवी मुंबई : नेरुळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय यांच्या वतीने २९ मार्च रोजी एक दिवसीय चित्र प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक भवन येथे भरविण्यात आले होते. या चित्र प्रदर्शनात नवी मुंबईतील चित्रकार सर्जेराव कुईगुडे, शिवशरण,वसंतराव, उल्हास सावंत, अंथोनी डिसुजा, शशिकांत पाटील, गणेश पाटील, जगदिश कर्जेकर यांची पन्नास चित्रे लावण्यात आली होती.

ज्येष्ठ चित्रकार शंकर सोनवणे आणि डॉ.उपेंद्र किंजवडेकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. नेरुळ परिसरातील शेकडो चित्र रसिकांनी या चित्र प्रदर्शनाचा लाभ घेतला.सौ. वृंदा परुळेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तेरणा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी राबवला बीजगोळे बनवण्याचा उपक्रम